Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : माजी नगरसेविका पुत्राचा अपघाती मृत्यू; मारुती मंदिरासमोरील घटना

Share

सिन्नर | प्रतिनिधी

येथील माजी नगरसेविका लता मुंढे यांचा मुलगा पहाटे झालेल्या अपघातात ठार झाला. राहुल मुंढे या मुलाचे नाव होते. पहाटे एका पर्यटकांच्या गाडीमध्ये चहा देण्यासाठी तो गेला होता, चहा झाल्यानंतर बिल घेत असताना मागून आलेल्या एका भरधाव वाहनाने धडक दिली. या घटनेत राहुल याचा जागीच मृत्यू झाला.

शहरातील मारुती मंदिरासमोर ही घटना घडली. मुंढे यांची याच परिसरात चहाची टपरी आहे. पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास एक टेम्पो ट्रव्हलर चहा पिण्यासाठी थांबला होता.

त्याचे बिल घेत असतानाच घोटीच्या बाजूने येणाऱ्या एका ट्रकने राहुल यास जोरदार धडक दिली. या घटनेत राहुल अनेक फुट फरफटत गेला होता.

मयत राहुल हा माजी नगरसेविका लता मुंढे यांचा मुलगा असून त्याचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, तीन वर्षांची मुलगी, आई वडील, भाऊ असा परिवार आहे. घरातील करता माणूस

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!