Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पाण्याच्या टँकरखाली आल्याने ११ वर्षीय मुलाचा मृत्यू; बागलाण तालुक्यातील घटना

Share

सटाणा | वार्ताहर

संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. शेतीसाठी पाणी वाहतूक करत असतांना टँकरखाली आल्याने विरगाव येथील एका अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षय नंदू गांगुर्डे (वय ११) असे या मुलाचे नाव आहे. तो आपल्या वडिलांसोबत पाण्याच्या टँकर  भरण्यासाठी गेला होता. याच वेळी त्याचा तोल गेल्याने तो  रस्त्यावर कोसळला त्यात  त्याचा मृत्यू झाला.

आज (दि.०६)  सकाळी सात वाजेच्या सुमारास वटार (ता. बागलाण) येथे घडली. बागलाण तालुक्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पाण्याने भरलेले टँकर परत येत असताना अक्षयचा तोल गेल्याने तो खाली पडून त्याचे अपघाती निधन झाले. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून विरगावसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!