Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

माणिकपुंज हत्येचा छडा; लहान भावानेच केला मोठ्याचा खून

Share

नाशिक । प्रतिनिधी

माणिकपुंज येथील शेतकरी रफिक शेख (वय २७) याची हत्या केल्याची काल घटना घडली होती. लहान भावानेच मोठ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. कौटुंबिक कारणातून राग अनावर झाल्याने लहान भावाने मोठ्याचा काटा काढण्याचा कट रचला. त्यास वीजपंप सुरु होत नसल्याचे कारण देत शेतात बोलावले. त्यानंतर त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून त्यास ठार केले.

अधिक माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज येथील तरूण शेतकरी रफिक लतिफ शेख, वय 27 हा त्याच्या शेतात मक्याच्या पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता, दरम्यान रात्री तो घरी परतला नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 23 तारखेला त्याचा मृतदेह सकाळच्या सुमारास माणिकपुंज शिवारात टाकली रोड येथील मोरीनजीक मिळून आला होता.

मयत रफिक यास अंगावर धारदार शस्राने वार करून ठार केले होते. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हत्येचा तपास मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक संदिप घुगे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे, नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तात्काळ तपासाची सूत्रे फिरवली.

घटनास्थळी धाव घेत घडलेल्या परिस्थितीचा व घटनास्थळाचा आढवा घेतला. गुन्हा झालेल्या ठिकाणाची बारकाईने पाहणी करून गुन्हा करण्याची पध्दत व गुन्हयात वापरलेले हत्यार याबाबत सविस्तर आराखडा तयार करून गुन्हयातील अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला.

मयत रफिक याचे कोणासोबत वाद होते का याबाबत माहिती घेतली. त्यानंतर संशयास्पद हालचाली ओळखून रफिक याचा लहान भाऊ तौफिक आणि त्याचा चुलत भाऊ सलमान या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी रफिक यास जीवे ठार मारल्याची कबुली दिली. त्यांनी दिलेल्या कबुलीनंतर खुनाचा उलगडा झाला.

मयत रफिक शेख हा घरातील कर्ता पुरुष होता. तसेच तो ब-याच दिवसांपासुन त्याचा लहान भाऊ तौफिक याच्या पत्नीकडे दादागिरी करून अनैतिक संबंधाची मागणी करत असे. हा प्रकार लहान भाऊ तौफिक याच्या लक्षत याचे लक्षात आल्यावर त्याने राग मनात धरून मोठया भावाचा काटा काढण्यासाठी त्याने कट रचला.मुख्य संशयित तौफिक याने त्याचा चुलत भाऊ सलमान याच्या साथीने मोठा भाऊ रफिक यास शेतातील वीजपंप सुरु होत नाही म्ह्णून बोलावून घेतले.

तौफिक याने रफिकशी बायकोला त्रास दिल्याच्या कारणावर हुज्जत घातली. त्यांनतर दोघांमध्ये वाद विकोपाला गेला. राग अनावर झाल्याने दोघांनी रफिक यास सोबत आणलेल्या कुऱ्हाडीने डोक्यात व शरीरावर वार केले. यात रफिकचा जागीच मृत्यू झाला.

गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक करपे, नांदगाव पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी, पोउनि पानसरे, स्थागुशाचे सपोउनि रवि शिलावट, पोहवा रविंद्र वानखेडे, नामदेव खैरणार, वसंत महाले, शांताराम घुगे, पोना राकेष उबाळे, हरिश आव्हाड, प्रविण सानप, पोकॉ गणेश नरोटे, रतिलाल वाघ, फिरोज पठाण, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नांदगाव पोलीस ठाण्याचे पोहवा राजु मोरे, रमेश पवार, पोना राकेश चौधरी, अनिल शरेकर, प्रविण गांगुर्डे, भूषण आहिरे, पोकॉ पंकज देवकाते, सागर कुमावत, दिनेश सुळ यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!