Video : ब्रह्मगिरीच्या तिसऱ्या फेरीसाठी ईदगाह मैदानावर भाविकांची मोठी गर्दी

0

नाशिक | ब्रह्मगिरीच्या तिसऱ्या फेरीसाठी भाविक त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. बम बम भोले, हरहर महादेवच्या गजरात ईदगाह मैदान परिसर दुमदुमून निघाला आहे. ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी महिला भाविकांची लक्षणीय गर्दी बघावयास मिळत असून तरुण वर्गाचादेखील समावेश आहे.

फेरीसाठी परप्रांतीय भाविक नाशिकहून त्र्यंबककडे मोठ्या संख्येने रवाना होताना दिसून आले. रात्रीच्या वेळी फेरीला अधिक गर्दी होत असल्यामुळे पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही वॉच या परिसरावर ठेवण्यात आला आहे.

मेळा बस स्थानकाचे काम सुरु असल्यामुळे ईदगाह मैदानावर त्र्यंबकसाठी बसेस सोडल्या जात आहेत. राज्य परिवहन महामंडळाकडून तयारी पूर्ण झाली असून २७५ जादा बसेस नाशिक त्र्यंबक मार्गावर धावणार आहेत.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारास अधिक महत्व असल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन होतात.

भाविक कुशावर्तावर गेल्यानंतर स्नान करून ओल्या कपड्यातच फेरीला सुरुवात करतात. प्रयाग तीर्थाला वळसा घालून भाविक पुढे  त्र्यंबक इगतपुरी रस्त्याने पहिने मार्गे फेरीसाठी रवाना होतात. साडेतीन ते चार तासांची फेरी पूर्ण करून पुन्हा त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक सापगाव, तळेगाव मार्गे दाखल होतात.

नाशिकहून त्र्यंबकला जाताना भाविक

LEAVE A REPLY

*