Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : प्राध्यापिका डॉ. अनिता गोगटे यांचे निधन

Share

नाशिक | प्रतिनिधी 

एच. पी. टी. महविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख आणि गोगटे सेल्स या नामवंत उद्योगाचे विवेक गोगटे यांच्या पत्नी डॉ अनिता गोगटे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.

त्या ६२ वर्षांच्या होत्या. विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका असा लौकिक प्राप्त केलेल्या डाॅ गोगटे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सार्वजनिक वाचानालायासह अनेक संस्थांचे आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

गोखले एज्युकेशनच्या बीवायके काॅलेज आणि पुढे एचपीटी काॅलेज या महाविदयालयात ३५ वर्षे सेवा करून स्वेच्छानिवृतीचा निर्णय त्यांनी घेतला.

मनमिळाऊ ,सर्जनशील अशा अनिता गोगटे यांच्या निधनाने संपूर्ण महाविद्यालयच नव्हे तर शैक्षणिक सामाजिक क्षेत्रावर शोकककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, गोगटे सेल्सचे कार्यकारी अधिकारी मुलगा आदित्य, सून स्वाती, मुलगी अनुजा आणि नातवंडे असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!