Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मांडूळ तस्करी करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

म्हसरूळ शिवारात मांडूळ खरेदीसाठी आलेल्या दोघा तस्करांच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. पिराजी ज्ञानबा कीर्ते (वय ३०), व वैजनाथ बालाजी सोनटक्के (वय ३० दोघे राहणार परळी) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर दोघे जण फरार आहेत. दोघांचा शोध सुरु असून वन विभागाकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.

महसूळ शिवारात मांडूळ खरेदीसाठी काही तस्कर येणार असल्याची गुप्त माहिती वनपाल मधूकर गोसावी यांना मिळाली.

त्यानुसार गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने शामप्रसाद मुखर्जी उद्यान, यशोदानगर, पेठ रोड येथे सापळा रचला. संशयित कीर्ते आणि सोनटक्के हे चारचाकी वाहनातून (एमएच ०४, जीडी ५८४६) तिथे आले. अरुण थेटे यांच्या घरात मांडूळाची पाहणी सुरु असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कीर्ते व सोनटक्के यांना रंगेहाथ पकडले तर दोन संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

संशयितांकडून चार मीटरचे मांडूळ तसेच मोबाईल हस्तगत करण्यात आले. दोघा संशयितांना न्यायालयात हजार केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उपवनसंरक्षक शिवाजी फुले, सहायक वनसंरक्षक गानेह्स झोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, राजेंद्र ठाकरे, उत्तम पाटील, गोविंद पंढरे, विजय पाटील, रोहिणी पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!