Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आधी ‘ए लाव रे तो व्हिडीओ’, अन् आता ‘बंद कर रे तो टीव्ही’

Share

नाशिक । कुंदन राजपूत

महाआघाडीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ज्या ठिकाणी त्यांच्या तोफेला बत्ती दिली त्या ठिकाणचे उमेदवार जोरात आपटले. ठाकरे यांच्या सभांचा फायदा विरोधकांऐवजी सत्ताधार्‍यांना अधिक झाला. प्रचार काळात त्यांचे ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ हे विधान महायुतीसाठी डोकेदुखी ठरले होते. मात्र, निकालानंतर हा फुसका बार ठरल्याचे स्पष्ट झाले. सोशल मीडियावर मनसेप्रमुख टिंगलचा विषय ठरत असून ‘बंद कर रे तो टीव्ही’ अशी सोशल मीडियावर त्यांची फिरकी घेतली जात आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची मुलूख मैदान तोफ. ज्या दिवशी कडाडेल त्या दिवशी विरोधकांच्या गडाला सुरंग लागलाच समजा. यंदा देखील राज ठाकरे यांनी ‘मोदी -शाह’ हटाव नारा देत महाराष्ट्रभर सभांचा फड गाजवला होता. विशेष म्हणजे त्यांच्या सभा या महाआघाडीच्या पथ्यावर पडेल, अशी चर्चा होती.

महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यत पंतप्रधान मोदी व राज्यातील फडणवीस यांचे सरकारच्या योजनांची त्यांनी पोलखोल करण्याचा एक कलमी कार्यक्रम लावला होता. त्यांनी मोदी, शाह, फडणवीस यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतला होता.ठाकरे शैलीतील भाषण ऐकायला सर्व ठिकाणी तुफान गर्दी होत होती. विशेष म्हणजे ‘ए लाव रे तो व्हीडीओ’ या खास शैलीमुळे प्रचारात रंगत आणली होती.

देशभर त्यांच्या या प्रयोगाची जोरदार चर्चा होती. ठाकरे यांच्या सभेमुळे महाआघाडीच्या उमेदवारांची लॉटरी लागेल, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, निकालाचा कल पाहता ठाकरे यांचा करिष्मा चालू शकला नाही, हे स्पष्ट झाले. सातारा व रायगडचा अपवाद सोडला तर, इतर ठिकाणी महाआघाडीच्या उमदेवारांचा दारुण पराभव झाला. आता ठाकरे यांच्या ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ ची नेटीझन्सकडून फिरकी घेतली जात आहे.

ठाकरेंनी सभा घेतलेले मतदारसंघ

ठिकाण विजय
नाशिक – शिवसेना
पनवेल – शिवसेना
नांदेड – भाजपा
सातारा – राष्ट्रवादी
मुंबई – शिवसेना
इचलकरंजी- शिवसेना
ईशान्य मुंबई – भाजपा
रायगड – राष्ट्रवादी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!