वीज तारा तुटल्या; 10 गावांचा वीजपुरवठा खंडित

0

देवळाली कँम्प । वार्ताहर

भगूर सबस्टेशनलगत पडीत जागेवरील अकरा हजार होल्ट वायर मंगळवारी रात्री तुटल्याने पांढुर्लीसह 9-10 गावांचा विद्युतपुरवठा खंडित झाला होता.

विशेष म्हणजे वीजमंडळाचे कँबिनेट मंत्री महोदय यांचा आदेश असून वायर इतरत्र शिफ्ट करत नसल्याची तक्रार जागा मालकांनी केली आहे.

भगूर- लहवित रस्त्यावर सबस्टेशन असून या ठिकाणाहून पांढुर्लीसह चाळीस गावांना विद्युत पुरवठा व नियंत्रण ठेवणारी यंत्रणा आहे.

या ठिकाणाहून पांढुर्लीसह 9-10 गावांना विद्युत पुरवठा वहन करणारी अकरा हजार होल्ट वायर रात्री तुटल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, बुधवारी दुपारपर्यंत सदर वायर जोडणीचे काम सुरू होते. जागामालक मोहन कंरंजकर यांनी सदर वायर इतरत्र हलविण्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदेश देण्यासह या कामाच्या खर्चाकरिता जिल्हा नियोजन समितीने कामाला मंजुरी देऊनही काम होत नसल्याने धोकादायक वायर तुटून जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल कंरंजकर यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

*