Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : सुसाट धावणार्‍या वाहनांना गतिरोधकांचा लगाम

Share

डुबेरे | दि. 18 वार्ताहर

वार्‍याबरोबर स्पर्धा करणारी वहाने महामार्गांवर नेहमीच धावतांना दिसतात. सुसाट धावणार्‍या वहानांमुळे अनेकदा मोठ-मोठे अपघात घडले आहेत. चौफूलीच्या ठिकाणी तर हमखास अपघात होणारच. त्यावर उपाययोजना म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने सुसाट धावणार्‍या वहानांना चौफूलीच्या रस्त्यांवर गतिरोधक (सुडो ब्रेकर) टाकून लगाम लावला आहे.

ग्रामीण भागातून शहराला जोडणारी सर्व रस्ते गुळगुळीत झालेली आहे. त्यामुळे वाहनेही अतिशय वेगात धावू लागली आहे. या वहानांचा वेग नियंत्रीत करताना अनेकदा अपघात घडले आहे. रस्ता क्रॉसींगच्या (चौफूली) ठिकाणीही अपघातांचे प्रमाण अधिक आहे.

अगोदर रस्त्यांवर डांबरी गतिरोधक टाकलेले असायचे. हे गतीरोधक अंधारात गाडी चालकाला दिसत नसायचे, त्यामुळेही अपघात घडायचे. आता चौफूलीच्या भागात पादचार्‍यांना रस्ता ओलांडणे सोपे व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक (सुडो ब्रेकर) टाकले आहे.

पिवळ्या व काळ्या रंगात असलेले हे गतीरोधक रात्रीच्या वेळीही स्पष्ट दिसत आहे. या गतीरोधकांमुळे भरधाव धावणार्‍या वाहनांच्या वेगाला आवर बसला आहे. त्यामुळे पादचारी, दूचाकीधारकांना रस्ता ओलांडणे सोपे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रिफ्लेक्टर व गतीरोधकांची ठिकठिकाणी व्यवस्था केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!