Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दुष्काळाचा दाह: चांदगावमध्ये पाणी, चाऱ्याअभावी गाईचा मृत्यू; उपाययोजना करण्याची मागणी

Share

मुकुंद आहिरे |  चांदगाव

येवला तालुक्यातील चांदगाव येथे चारा अभावी भुकेने व्याकूळ झालेल्या गायीचा मुत्यू झाल्याची घटना घडली.  या परिसरात गाय दगावल्याची दुसरी घटना आहे.

नायगव्हाण येथे दहा दिवसापुर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने गाय दगावली होती. या परिसरातील सतत घडणाऱ्या घटना बघता याठिकाणी उपाययोजना व्हायला हव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

एकीकडे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच याठिकाणी बोअरवेल घेऊनही पाणी लागत नाही. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

गावात एकच शासकीय टँकरची फेरी होते. गावातील विहिरी बोअरवेल हे आज कोरडे ठाक पडलेले आहेत. गावात दुसरा पाण्याचा कुठलाही स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे गावाची पाण्याची मदार केवळ शासकीय टँकर वर अवलंबुन आहे.

दुष्काळाने दगावत असलेल्या जनावरांना वाचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत  अशी मागणी येथील शेतकरी करू लागले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!