अशोकस्तंभ परिसरात सांडपाणी रस्त्यावर; पसरली दुर्गंधी

0

नाशिक, ता. १२ : शहरातील अशोकस्तंभ परिसरात मैला सांडपाणी वाहून नेणारी एक वाहिनी फुटल्याने भल्या सकाळी येथील रस्त्यांवर मैला आणि सांडपाण्याचे साम्राज्य पसरले.

त्यामुळे या परिसरात भयानक दुर्गंधी पसरली असून, येथील रहिवाशांसह येणाऱ्या जाणाऱ्यांना सकाळपासून नाक मुठीत घेऊनच चालवे लागत आहे.

हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत महापालिकेच्या स्वच्छता विभागाचा कुणीही कर्मचारी घटनास्थळी दुरुस्तीसाठी हजर नव्हता.

LEAVE A REPLY

*