Thursday, April 25, 2024
Homeनाशिककोरोना : आयएएस अधिकारी डॉ. पंकज आशिया मालेगावचे मुख्य समन्वयक आणि घटना...

कोरोना : आयएएस अधिकारी डॉ. पंकज आशिया मालेगावचे मुख्य समन्वयक आणि घटना व्यवस्थापक

नाशिक | प्रतिनिधी 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मालेगाव येथे स्थानिकस्तरावर इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरता एक समन्वयक अधिकारी म्हणून कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा साहायक जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली आहे. पूर्वी ही जबाबदारी मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे होती.

- Advertisement -

गेल्या ४८ तासांत मालेगावमधील कोरोना बाधितांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. मालेगावी तयार करण्यात आलेल्या इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरमधून परिस्थिती नियंत्रणात आणली जाणार आहे. यासाठी इथे सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. डॉ आशिया यापुढे सेंटरचे प्रमुख समन्वयक आणि  घटना व्यवस्थापकाची भूमिका बजावणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे मुख्यालय मालेगाव ठेवण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी मांढरे यांनी आज काढलेल्या आदेशानुसार, मालेगाव शहर दाट लोक संख्येचे वस्त्यावस्त्यांचे आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या याठिकाणी वाढली आहे. याठिकाणी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एका सक्षम अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

यापार्श्वभूमीवर मालेगावी इमरर्जेन्सी ऑपरेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सर्व अधिकाऱ्यांवर स्थानिक पातळीवर पर्यवेक्षण होणे, तसेच आपापसात पूर्ण समन्वय राखून एकत्रित कार्यवाही केली जावी हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे डॉ. आशिया यांची घटना व्यवस्थापक व प्रमुख समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

डॉ. आशिया यांना आता मालेगावची परिस्थिती हाताळायची असून त्यांच्यावर सेंटरमध्ये नेमून दिलेली कामे अधिकारी व्यवस्थित पार पाडत आहे कि नाही यावर लक्ष ठेवणे, परिस्थितीनुसार नियोजन करणे, महत्वाच्या बाबीसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करणे, कोन्हीही अधिकारी चालढकल करत असल्यास त्याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे आदि अधिकार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत डॉ. आशिया यांचे मुख्यालय हे मालेगाव असेल असे आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या