Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ओळखपत्र नसल्याने भारती पवारांना अडवले; तासाभरापासून डॉ. पवार गेटच्या बाहेरच

Share

नाशिक | प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदार संघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडवून ठेवले आहे.

विजयाकडे आगेकूच करणाऱ्या पवार यांना गेटवरच अडवून ठेवल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. डॉ. पवार यांच्यासाठी नाशिक लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे मतमोजणी केंद्राच्या जवळ गेटवर आले आहेत.

डॉ. पवार आल्याशिवाय गोडसे यांनाही आत प्रवेश करता येणार नसल्याने तेही याच मतमोजणी गेटवर ताठकळत उभे आहेत. डॉ. पवारयांचा चालक पास आणण्यासाठी गेला असून जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत डॉ. पवार यांना गेटवरच थांबावे लागणार आहे.

त्यांतरच दोन्ही विजयी उमेदवार मतदान केंद्रात प्रमाणपत्र घेण्यासाठी येणार असल्याची माहिती प्रतिनिधीकडून देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!