Type to search

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीस पाटलांची बैठक

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी घेतली पोलीस पाटलांची बैठक

Share

नाशिक | प्रतिनिधी

ग्रामीण भागातील गुन्हेगारी वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांनी आज दिंडोरी तालुक्यातील पोलीस पाटलांची भेट घेतली. यावेळी स्थानीक पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह पंचक्रोशीतील पोलीस पाटील उपस्थित होते.

यावेळी, डॉ. सिंग म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुक तसेच जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था, अवैध धंदे समुळ
उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी सावधानता बाळगायची आहे. महाराट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अन्वये पोलीस पाटलांना त्यांचे कर्तव्य समजावुन सांगितले.

स्थानिक पातळीवर पोलीस पाटलांचे महत्व पटवुन दिले, तसेच कर्तव्य बजावत असतांना त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास करावा याबाबत डॉ. सिंग यांनी मार्गदर्शन केले.

स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवुन ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणे, जनतेतील आप-आपसातील वादांवर नियंत्रण मिळविणे, सार्वजनिक उत्सव एकोप्याने साजरे करणे, याशिवाय जातीय व धार्मिक सलोखा राखणे, अवैध धंद्यांना प्रतिबंध करणे, सामाजिक सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवणे अशा उपाययोजनांच्या आखणीत तंटामुक्त गाव समितीची भूमिका स्पष्ट करून याचे महत्व पटवून दिले.

गावात येणा-या भटक्या टोळया, पाल टाकुन राहणारे व्यक्ती, संशयीत इसम यांच्याबाबत स्थानिक पोलीस ठाणेस अवगत करावे व त्यांच्या सविस्तर नोंदी मुशाफिर रजिस्टरमध्ये घेण्याबाबतही दिल्या.

गावागावातील आपापसातील तंटे भांडणे मिटविण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची असल्याने पोलीस पाटलांच्या शब्दांना समाजात आजही मान आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी आपापली नैतिकता सांभाळत गावांमध्ये सलोखा संकल्प राबविण्याचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!