नाईट लाईफ शब्दप्रयोग चुकीचा; मुबंई चोवीस तास धावली पाहिजे – अमित देशमुख

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक | प्रतिनिधी 

नाईट लाईफ शब्दप्रयोग चुकीचा मुबंई चोवीस तास धावली पाहिजे हा त्या मागचा उद्देश असल्याचे मत वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री डॉ. अमित देशमुख यांनी मांडले. ते नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १९ व्या दीक्षांत समारंभासाठी नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मुंबईतील नाईट लाईफवर भाष्य केले.

ते म्हणाले, मुंबईच्या बाबतीत आताच निर्णय घेतला जातोय त्याचा अनुभव आणि प्रतिसाद घेतला बघितला पाहिजे. अनेकजन यावर टीका टिपण्णी करत आहेत पण सध्या याची कुठलीही गरज नाही किंवा आवश्यकताही नाहीये. आधी प्रतिसाद बघू देत मग काय बोलायचे ते बोलू असा युक्तिवाद देशमुख यांनी करत नाईट लाईफचे एकप्रकारे समर्थनच केले आहे.

मुंबईत नाइट लाइफ सुरू करणार, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून विरोध दर्शिवला जात आहे. मुंबईतील नाइट लाइफ तरुणांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यामुळे बलात्काराच्या घटना वाढतील आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कुमक नसल्याचेही अनेकजण म्हणत आहेत.

अमित देशमुख म्हणाले की, लगेच टीका टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. नाईट लाईफ शब्दप्रयोग चुकीचा असून मुबंई चोवीस तास धावली पाहिजे हा त्या मागचा उद्देश आहे. मुंबई चोवीस तास धावली तर आर्थिक राजधानीला अधिक बळ मिळेल असेही म्हटले जात आहे.

यासोबत ना. देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि तान्हाजी चित्रपटावर सुरु झालेल्या वादळावर भाष्य करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि तान्हाजी यांच्या फोटोचा वापर करून प्रचार केला जात असेल तर निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी. असा वापर करणं संयुक्तिक नाही असेही ते म्हणाले.

वैद्यकीय व्यवस्थेसाठी धोरण आखणार

शहराप्रमाणेच खेड्यापाड्यात डॉक्टर जायला पाहिजे यासाठी सरकार म्हणून प्रयत्न केले जातील. सर्वांना एकत्र आणून धोरण आखले जाणार आहे. राज्यात  डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही त्यासाठी सरकार म्हणून लक्ष घालू.

  • डॉ. अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *