Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

जुन्या नाशकात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात १० जखमी

Share

जुने  नाशिक  | प्रतिनिधी 

जुन्या नाशिक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात १० जन जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहेत.

शहरातील अनेक भागात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दुचाकी किंवा चारचाकी वाहनाच्या पाठीमागे कुत्रे मागे लागून अनेक अपघात घडत आहेत. कुत्र्यांचा वावर मानवी वस्तीत वाढला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. महापालिकेने त्वरित दखल घेत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

कालच्या घटनेने जिल्हा रुग्णालयात रुग्णांनी प्रचंड गर्दी केली होती. कुत्रा चावल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिक पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागावर होती. रात्री उशिरा हा कुत्रा दिसल्यानंतर त्यास नागरिकांनी ठार केले.

लहान मुले सांभाळा

जुन्या नाशकात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश अधिक होता. लहान मुले कुठे खेळायला जात आहेत. ते काय करतात त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!