संप मोडण्यासाठी प्रशासन सज्ज; गुन्हे मागे घेण्याबद्दल खा. गोडसेंचे निवेदन

0

नाशिक, ता. ३ : संप मागे घेतल्याच्या घोषणेनंतरही नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी सुरूच ठेवलेल्या संप मोडून काढण्यासाठी, तसेच संपादरम्यान काही काही हिंसक घटना होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे.

आज सकाळी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी आंदोलन आटोक्यात न आल्यास पोलिसांवर कारवाई करणार असून आंदोलनादरम्यान बघ्याची भूमिका घेणाऱ्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली.

संपादरम्यान दूध व भाजीपाला वाहतुकीसाठी पोलिस संरक्षण देण्यात येणार असून आतापर्यंत १९४ वाहने सुरक्षित बाहेर काढली अशी माहितीही त्यांनी दिली.

जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असून सामान्यांना घाबरून जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत १५० आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरात आज अकरा टँकर दूध आल्याची माहिती देऊन उद्याही बाजारसमित्या सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान आज सकाळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावे असे निवेदन खा. हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले.

LEAVE A REPLY

*