Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Big Breaking : अन्यथा…तीन वाजेनंतर पोलीस बळाचा वापर करून काझीगढी खाली करणार

Share

जुने नाशिक  | प्रतिनिधी 

पावसामुळे होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर आज धोकेदायक काझीगढी येथील दीडशे कुटुंबांना स्थलांतरीत होण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. जर कुटुंबीय याठीकाणाहून निघाले नाहीत तर,  पोलीस बळाचा वापर करून दुपारी तीन वाजेनंतर काझीगढी येथील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.

दरम्यान, आतापर्यंत ८-१० कुटुंब संभाव्य धोका टाळण्यासाठी स्थलांतरीत झाले आहेत. याठिकाणी संरक्षक भिंत बांधावी, वर्षानुवर्षे आम्ही याठिकाणी राहत आहोत. मरून जाऊ पण येथून हलणार नाही असा पावित्रा येथील रहिवाशांनी घेतल्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

दरम्यान, घटनास्थळ धोकेदायक असून लवकरात लवकर खाली करा. प्रशासनाला वेठीस धरू नका अशा सूचना महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहेत.

स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांच्या निवाऱ्याची सोय तात्पुरत्या स्वरुपात येथील गाडगे महाराज महाराज धर्मशाळा, रंगार वाडा शाळा व बीडी भालेकर शाळेत करण्यात आली आहे.

घटनास्थळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त महेश डोईफोडे, विभागीय अधिकारी, पोलीस   यंत्रणा दाखल झाली असून लवकरात लवकर स्थलांतर करण्यासाठी नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला  जात आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!