Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

डॉ. भारती पवार दिंडोरीच्या पहिल्या महिला खासदार; धनराज महालेंचा दारुण पराभव

Share
विजय गिते | नाशिक
उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातुन  युतीच्या उमेदवार डॉ.भारती पवार यांनी आघाडीचे धनराज महाले यांना एक लाख ९८ हजार ६७९ मतांनी धूळ चारत जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्या महिला खासदार म्हणून सोनेरी अक्षरांची नोंद केली आहे.
दिंडोरी या महाले यांच्या होमटाऊनमध्ये त्यांना अपेक्षित मताधिक्य मिळवण्यात अपयश आले. असले तरी उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये डॉक्टर पवार यांनी मताधिक्य मिळवत विजयश्री खेचून आणली.
खुल्या प्रवर्गातील नांदगाव, येवला, चांदवड आणि निफाडसह कळवण येथील मतांनी त्यांना विजयश्री मिळवून दिली.  निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली.
गतवेळी भाजपकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढन्यासाठी त्यांना याच भाजपकडून उमेदवारी केली होती. जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून आदिवासींच्या कुपोषणावर आवाज उठविणार्‍या डॉ.भारती पवार या थेट संसदेपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत.  अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरी लोकसभेत पुन्हा भाजपचे कमळ फुलले.
आदिवासी मतदारसंघ असलेल्या कळवण-सुरगाणा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जे. पी. गावित यांनी 1 लाख 9 हजार 570 मते मिळवत आपले वर्चस्व राखले. तसेच राष्ट्रवादीचे नेते तथा डॉ.भारती पवार यांचे दीर नितीन पवार व जाऊबाई जयश्री पवार यांनी कडवा विरोध करूनही कळवणमध्ये राष्ट्रवादीला अपेक्षित आघाडी मिळवून देण्यामध्ये अपयशी ठरले. धनराज महालेंना दिंडोरी व पेठ तालुक्यात चांगली आघाडी घेतली.
उमेदवारांना मिळालेली एकूण मते पुढील प्रमाणे युतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार 5 लाख 67 हजार 470 आघाडीचे उमेदवार धनराज महाले तीन लाख 68 हजार 691 माकपचे उमेदवार आमदार जे पी गावित 1 लाख 9 हजार 570मते.

दिंडोरी विधानसभा निहाय मतदान
येवला –
भाजप 95343
राष्ट्रवादी 67311

निफाड
भाजप 93763
राष्ट्रवादी 58019

नांदगाव

भाजप 1,15,336
राष्ट्रवादी 40,425

चांदवड

भाजप 1,20,703
राष्ट्रवादी 40084

कळवण

भाजप 65,545
राष्ट्रवादी 60180

दिंडोरी
भाजप 74396
राष्ट्रवादी 1,01,814
———–

भारती पवार यांना मिळालेली आघाडी
येवला – 28032
निफाड – 35744
नांदगाव – 74911
चांदवड – 80619
कळवण- 5365
दिंडोरी –
(धनराज महाले यांना मिळालेली आघाडी – 27418)
जनतेने टाकलेल्या विश्वासाला  तडा जाऊ देणार नाही 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांच्या कालावधीत केलेलल्या भरीव विकासाला लोकांनी साथ दिली आहे. माझा विजय हा सर्वसामान्य नागरिकांचा विजय असून लोकांनी टाकलेल्या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही.
डॉ. भारती पवार,  नवनिर्वाचित खासदार
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!