Type to search

नाशकात जन्मले दोन डोके, चार हात-पाय असलेले अर्भक

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकात जन्मले दोन डोके, चार हात-पाय असलेले अर्भक

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये अनोख्या बालकाने जन्म घेतला आहे. या बालकाची नाळ एकाच असून दोन डोके, चार हात आणि पाय असे हे बालक आहे. सोनोग्राफीमध्ये दोघांचे शरीर चिकटलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महिलेची नॉर्मल डिलिवरी करण्यात आली.

महिला गुरटेंभी या सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आहे. ही महिला काल (दि. ०९) मध्यरात्री बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती.

तिची प्रकृती काहीशी चिंताजनक असल्याने तात्काळ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजित तिदमे यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तातडीने सोनोग्राफी करण्यात आली असता, पोटातील अर्भक जुळे असून ते एकमेकांना चिकटलेले असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांपुढे शस्त्रक्रियेचे मोठे आव्हान होते. बाळंतिणीच्या जीवाला धोका पोहोचण्याची शक्‍यता अधिक असल्याने या महिलेची मध्यरात्री नॉर्मल पद्धतीनेच बाळंतपण करण्यात आले.

या नवजात बालकांना दोन डोके, चार हात आणि चार पाय असे अवयव आहेत. तर या नवजात शिशूंच्या त्यांच्या शरीराचा छाती व पोटाचा भाग एकमेकांना चिकटलेला आहे.

त्यांच्या पोटाची नाळ देखील एकच असून शिशूंचे स्री जातीचे की पुरुष जातीचे ते समजू शकलेले नाही. प्रसुतीनंतर मातेसह बालकांची प्रकृती स्थिर असून बालकांना नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेले आहे.

दरम्यान, जुळ्यांची प्रकृती स्थिर राहिली तर त्यांना मुंबई येथे अधिक उपचारासाठी हलविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

जिल्हा सरकारी रुग्णालयात आत्तापर्यंत मातांनी जळ्यांना जन्म दिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. परंतु जुळे मात्र तेही एकमेकांना चिकटलेले अवस्थेतील बालक जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे. असे बालक आफ्रिका व दक्षिण आशिया खंडामध्ये जन्माला येण्याचे प्रमाण अधिक असून सुमारे 5 लाख नवजात बालकांच्या जन्मामागे एखादी घटना अशी घडते अशी माहिती वैद्यकीय तज्ञांनी दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!