Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

अनोखी भाऊबीज; बहिणीला साडीचोळी ऐवजी रोपटे भेट; भावाने दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Share

विखरणी | वार्ताहर

दिवाळीत भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ आपल्या बहिणीला माहेरची आठवण म्हणून साडी चोळी भेट देत असतो मात्र या दिवाळीत आपल्या बहिणीला झाडाचे रोपटे भेट देऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न भावाने केला असून भावाची ही प्रेमाची भेट आपल्या दारी लावून पर्यावरण वाचवण्यासोबतच झाडे लावण्याचा अनोखा संदेश बहीण आपल्या सासरी घेऊन जाणार आहे.

घटना आहे येवला तालुक्यातील कानडी येथील. येथील रहिवासी व सध्या दिंडोरी तालुक्यात कृषी सेवक म्हणून सेवा बजावणारे लक्ष्मण काळे यांनी झाडे लावण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेशही आपल्या दिवाळीच्या भाऊबीज भेटीच्या कृतीतून दाखवून दिला आहे.

लक्ष्मण काळे यांना दोन बहिणी असून एक बहीण नांदूर ढोक ता वैजापूर येथे तर दुसरी बहीण निफाड तालुक्यातील रुई येथे राहते. दरवर्षी दिवाळी रक्षाबंधनला ओवाळणी म्हणून आपण भेट देत असतो, मात्र शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही पर्यावरनाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत असून भरमसाठ वृक्षतोडही होत आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्याची आपलीही सामाजिक जबाबदारी ओळखून कृषी सहाय्यक लक्ष्मण काळे यांनी आपल्या लाडक्या बहिणीना भाऊबीजेची भेट म्हणून झाडांचे रोपटे दिले आहे. त्यांच्या या कृतीतून समाजात पर्यावरण संरक्षनाचा संदेश जाणार असून ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यास पुढे येणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!