Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : धनोली धरणाचे गेट तोडले; ऐन उन्हाळ्यात सात ते आठ एमसीएफटी पाणी वाया

Share

सापुतारा | वार्ताहर

कळवण तालुक्यातील धनोली येथील धरणाचे गेट तोडल्याची घटना घडली असून संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे ह्या घटनेने धरणातील अंदाजे सात ते आठ एमसीएफटी इतके पाणी वाया गेले आहे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात दळवट येथील चार इसमांनी धरणाचे गेट तोडले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान धनोली धरणाचे लोखण्डी गेट तोडले यानंतर धरणातून अचानक पाण्याचा प्रचंड असा लोट सुटल्याने धरणाच्या बाजूस शेतात काम करीत असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी गेटच्या बाजूने धावत जाऊन त्या चारही इसमांना पकडण्यात यशस्वी झाले.

तसेच संपूर्ण गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन ह्या इसमांना ताब्यात घेतले व धनोली गावातील मंदिरात त्यांना कोंडून ठेवले सदर इसमांनी चौकशी केली असता हे चारही इसम दळवट येथील रहिवाशी निघाले.

ही बातमी पसरताच धनोली गावात रात्रभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी प्रशासकीय यंत्रणेला लागताच संपूर्ण यंत्रणा धनोली गावात रात्री नऊ वाजेच्या सुमारास हजर झाली.

कळवणचे तहसीलदार बंडू कापसे तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे सहित अभोणा पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अभिजित रौंदळ हे घटनास्थळी दाखल झाले व सदर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली.

त्यानंतर धरणाचे गेट तोडणारे दळवट येथील इसमांना अभोणा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे नाव प्रमोद बयाजी पवार (६०), सोनू बंडू गावित(६०), शंकर केवजी चव्हाण (५५), सुभाष येवाजी पवार (६०) असून त्यांच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणून कलम ३ व ७ अन्वये नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या रविवारी सदर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सदर घटनेने आदिवासी शेतकरी अंबादास गायकवाड, हरिशचंद्र गायकवाड, सुखराम पवार, किसन वाघ, भास्कर दळवी सहित अनेक शेतकऱ्यांचे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे तीनशे क्विंटल कांदा वाहून गेला तसेच शेतात साठविलेला जवळपास दीडशे क्विंटल कांदा भिजला आहे व शेतात उभ्या असलेल्या मिरची, कोथंबीर, उन्हाळी बाजरी व वालपापडी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले आहे.

सदर घटनेने गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी शासनाने हि नुकसान भरपाई द्यावी व शेजाऱ्यांना न्याय द्यावा तसेच हा कालवा मागील पंधरा वर्षांपासून नादुरुस्त होता याची तक्रार वेळोवेळी केली असून पाटबंधारे विभागाने याची दखल घेतली नाही.

– हरिशचंद्र पाडवी, उपसरपंच धनोली

सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून सध्यस्थितीत धरणात १५ एमसीएफटी इतके पाणी होते परंतु गेट तोडल्याने जवळपास सात ते आठ एमसीएफटीइतके पाणी वाया गेले आहे तरी ह्या चारही इसमास पोलीसाच्या ताब्यात दिले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

– अभिजित रौंदळ, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कळवण

कळवण सारख्या सुजलाम सुफलाम तालुक्यात पाणी चोरी होणे म्हणजे भविष्यात तालुक्यात पाण्यावरून युद्ध होणार काय याची चिंता संपूर्ण कळवण तालुक्यातील जनतेला भेडसावीत असून तालुक्यात पाण्यावरून मोठे संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!