Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : छट पूजेसाठी गोदातीरी उत्तर भारतीयांचा मेळा; सूर्य देवतेची उपासना, पहाटे होणार सांगता

Share

पंचवटी | वार्ताहर

उत्तर भारतीयांचा महत्वाचा मानला जाणारा छट पूजा सण आज मोठया उत्साहात आणि भक्ती भावात गोदातीरी पार पडला. छट पर्वा निमित्त रामकुंड येथे मोठया संख्येने उत्तर भारतीय नागरिक उपस्थित होते. शहरात वास्तव्यास असलेल्या जवळ पास हजारो उतर भारतियानी आपली पूजा अर्चा करून सायंकाळी सूर्य देवाला अर्ध्य दिले. यावेळी भोजपुरी गीतांची मैफिलीसह फटाक्यांची आतीशबाजी करण्यात आली. पहाटे उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन छट पूजेची सांगता होईल.

नाशिक येथे कामानिमित्त स्थायिक झालेल्या उत्तर भारतीयांनी छटपूजा सण रामकुंड येथे साजरा केला. उत्तर भारतीय आपल्या परिवारा सोबत रामकुंड येथे गोदावरी नदी किनारी येउन सूर्य देवाची आराधना करीत असतात. छट पूजा निमित्त महिला निर्जल उपवास करतात.

तर काही महिला या दिवशी सूर्यास्त आणि दुसर्या दिवसाचा सूर्योदय दरम्यान पाण्यात उभे राहून सुर्याची उपासना करन्याची प्रथा असून महिलांनी छटपूजे साठी उसाचे तोरण करून सुपात अननस, केळी, संत्री, कोहळा, मुळा अशी विविध फळे आणि मध्, अत्तर ,नारळ ,देवीची प्रतिमा ठेउन त्याच्या समोर दिवे पेटवुन पूजा केली.

यावेळी संपूर्ण गंगाघाट,रामकुंड,गांधी तलाव ते गौरी पटांगण पर्यंतच्या गोदाकाठी परिसरात महिलांनी पूजा मांडली होती. मावळत्या सूर्याला अर्घ्य देत महिलांनी सूर्य देवतेची उपासना करत कुटुंबाच्या सुखसमृद्धीची मागणी केली.

नाशिकमध्ये छटपूजा उत्साहात

नाशिक शहरातील गोदाकाठी उत्तर भारतीय महिलांकडून छटपूजा उत्साहात साजरी

Posted by Deshdoot on Saturday, 2 November 2019

छट पूजे निमीत उत्तर भारतीय बांधवांसाठी गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री संत गाडगे महाराज कनौजिया धोबी समाज संस्थेच्या वतीने याठिकाणी मनोरंजना साठी ऑर्केष्ट्राचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये देवी आणि सूर्य देवता उपासना असे मराठी हिंदी व भोजपुरी गीते सादर करण्यात आले. पंचवटी पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सर्व फोटो : सतीश देवगिरे


छठ पूजेनिमित्त गोदाघाट परिसरात सायंकाळी गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे भोजपुरी गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रसिद्ध भोजपुरी गायक राजेश मिश्रा, गायिका प्रियांका मौर्य सहभागी झाले होते. भोजपुरी गीतांचा यावेळी उत्तर भारतीय बांधवांनी मनमुराद आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष उमापती ओझा यांच्यासह आदी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!