Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : देशदूत आयोजित लघुपट महोत्सवाचे थाटात उद्घाटन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

Share

नाशिक | प्रतिनिधी 

दैनिक ‘देशदूत’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सामाजिक भान’ या विशेष अभियानाला जानेवारी २०२० मध्ये सुरुवात करण्यात आली. अभियानाच्या लघुचित्रपट स्पर्धा आणि महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडले.

सामाजिक भान अर्थात ‘सिव्हिक सेन्स’ हा विषय घेऊन ‘देशदूत’ने समाजात जनजागृती घडवून आणण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. बदलत्या काळात जगणे सुखकर, सोयीस्कर व आनंददायी व्हावे, यासाठी सामाजिक भान जपणेही काळाची गरज असून हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. या अंंतर्गत विविध  विषयांवर प्रकाशझोत टाकण्याचे काम करून पत्रकारिते बरोबरच समाज प्रबोधनाचे कामही ‘देशदूत’ करीत आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना ‘ग्लोबल टू लोकल’ अर्थात जगाच्या पटलावर वावरताना गावातील, शहरातील अस्तित्व महत्त्वाचे ठरते. जगणे किंवा जगताना आपल्या सामाजिक जबाबदार्‍या पाळल्या गेल्यावर प्रत्येक गावाचा आणि शहराचा ‘लिव्हेबिलीटी इंडेक्स’ वाढू शकेल, असे मत ‘देशदूत’चे व्यवस्थापकीय संचालक जनक सारडा यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

‘देशदूत’ने डिजिटल माध्यमांत भक्कम पाय रोवला असून या वाटचालीत दृकश्राव्य माध्यमाची ताकद जाणून, रस्त्यात कचरा टाकू नका, रांगेची शिस्त पाळा, विनम्र वागा, रस्त्यावर थुंकूनका,अन्नाची नासाडी थांबवा, क्रोध आवरा, वायू प्रदूषण टाळा,‘ओला आणि सुका कचरा वेगळा करा’या विषयांवर अभियान सुरू केले आहे. यावर आधारित लघुचित्रपट माध्यमासाठी निवडले आहे.

या झालेल्या समारंभात लघुचित्रपट स्पर्धा आणि महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण ‘देशदूत’चे संचालक रामेश्वर सारडा, डॉ. कुणाल गुप्ते, हेमंत बेळे, रेखा नाडगौडा व डॉ.वैशाली बालाजीवाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘देशदूत’ लघुचित्रपट महोत्सवाची चित्रफितही दाखवण्यात आली.याठिकाणी लावण्यात आलेले कचरा नको, प्रदूषण नको,थुंकू नये,अन्न नासाडी करू नये, अशी जनजागृती करणारे पोस्टर्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

एक नाशिककर म्हणून ‘देशदूत’ने पुढाकार घेत हे अभियान सुरू केल्याचे ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी सांगितले.उपस्थित मान्यवरांनीदेखील या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत यात सहभागी होताना आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

लघुपट स्पर्धेला प्रारंभ
ही लघुचित्रपट स्पर्धा भारतभर खुली असणार आहे. ‘सामाजिक भान’ या विषयावरील ५० सेकंदांचा लघुपट आवश्यक आहे. १५ फेब्रुवारीपर्यंतच लघुपट पाठविता येतील. अधिक तपशीलwww.deshdoot.com आणि  www.deshdoottimes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ताकद ‘पन्नास’ची!
‘देशदूत’ला पन्नास वर्षे पूर्ण झाले असून वस्तू, तत्वनिष्ठ व विश्वासाह्य पत्रकारितेसाठी जपल्या गेलेल्या ‘देशदूत’ची ही वाटचाल प्रेरणा देणारी आहे. ‘शिल्पकार विकासाचा’ हीच भूमिका ‘देशदूत’ने बजावली असून माध्यम म्हणून यापुढेही कार्यरत असणार आहे. पन्नास वर्षे लक्षात घेता लघुचित्रपट ५० सेकंदांचा असावा, ही संकल्पना पुढे आली आणि याच माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडेल, हा विश्वास ‘देशदूत’ने बाळगला आहे

मान्यवरांची उपस्थिती
नीलिमाताई पवार, रितू अग्रवाल, डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. प्रशांत देवरे, वैद्य विक्रांत जाधव, राहुल निगम, विनोद पारीख, प्रकाश लढ्ढा, सागर मुंदडा, अ‍ॅड. नितीन ठाकरे, नगरसेवक गुरुमित बग्गा, सुनील कोतवाल, सुनील भायभंग, मनीष कोठारी, विनायक रानडे, अविराज तायडे, सुशील बागड, भाविक ठक्कर, सत्यप्रकाश मुच्छाल आदींसह मान्यवर.

 

उद्घाटन सोहळ्याचा संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा….

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!