Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : फेब्रुवारीत ‘देशदूत राष्ट्रीय शॉर्टफिल्म फेस्टिव्हल’ स्पर्धा

Share

‘सामाजिक भान’ या विषयावर फिल्मस् पाठविण्याचे आवाहन, विजेत्यांना रोख बक्षिसे

नाशिक ।  प्रतिनिधी
पारदर्शक आणि समाजप्रबोधनात्मक पत्रकारितेच्या जोरावर गेली अनेक वर्षे ‘देशदूत’ने वाचकांशी नाळ जोडली आहे. ‘देशदूत’ने यंदा 50 व्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने झी आणि इंटरनॅशनल अ‍ॅडव्हर्टायझिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय शॉर्टफिल्म (लघुपट) फेस्टिव्हल आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘देशदूत’कडून सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) या विषयावर सामाजिक भान जपणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अन्न वाया घालवू नये, ई-कचरा, ओला आणि सुका कचर्‍याचे सुयोग्य नियोजन, सार्वजनिक स्वच्छता जपणे या विषयांच्या आधारे जनजागृती केली जात आहे.

सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) असा या फेस्टिव्हलमध्ये मागविण्यात येणार्‍या शॉर्टफिल्मस् चा विषय आहे. 50 सेकंदांची मर्यादा असलेल्या शॉर्टफिल्मस् 15 फेबु्रवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इथे क्लिक करा 

या स्पर्धेविषयीच्या नियम आणि अटी आमच्या www.deshdoottimes.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ‘देशदूत’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शॉर्टफिल्म फेस्टिव्हल व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

आमच्या अधिकृत मेल आयडीवर शॉर्टफिल्मस् आल्यानंतर परीक्षकांच्या निर्णयानंतर 50 शॉर्टफिल्मस् चे स्क्रिनिंग करण्यात येईल. तदनंतर अंतिम तीन शॉर्टफिल्मस् ना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यादरम्यान स्पर्धकांसह नाशिककरांना तंत्रज्ञानावर आधारित ज्ञानार्जनाची संधीही उपलब्ध होणार आहे.


असे आहेत विषय

या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) आधारित विषय गरजेचे आहेत. यात सामाजिक भान जपणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, अन्न वाया घालवू नये, ई-कचरा, ओला आणि सुका कचर्‍याचे सुयोग्य नियोजन, सार्वजनिक स्वच्छता जपणे, पर्यावरण संरक्षण, सामाजिक सलोखा, वाहतूक नियम पाळणे, रस्त्यावर वाद न घालणे, सार्वजनिक मालमत्तेची जपवणूक करणे या विषयांचा समावेश आहे.


इथे करा नोंदणी

या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी आमच्या www.deshdoottimes.com किंवा www.deshdoot.com  या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करा. अधिक माहितीसाठी आमच्या 9028675814 या क्रमांकावर संपर्क साधा. एक व्यक्ती कमाल तीन प्रवेशिका पाठवू शकतो, याची नोंद घ्यावी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!