Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

देवळा : तेरा एकर मका पिकावर फिरवला नांगर

Share
वासोळ | वैभव केदारे 
देवळा तालुक्यातील वासोळ येथील शेतकरी संदिप भामरे यांच्या १३ एकर  क्षेत्रावरील मका पीक लष्करी अळी च्या प्रादुर्भावामुळे  संपूर्ण मका पिक नांगरून टाकण्याची वेळ आली आहे. सुरुवातीस सलग ८ ते १० दिवस सततधार पावसामूळे मका पीक पिवळे पडले पाऊस बंद झाला आणि लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने या शेतकऱ्याचे  मजूर,रासायनिक औषधे,खतखाद्य आणि बियाणे यागोष्टींवर ५२ ते ५३ हजार रुपयाचा झालेला  खर्च वाया गेला आहे.
मका पिक मोठे झाल्यावरही लष्करी अळीचा प्रादुर्भाव जाणवतोच मका पिक घेतल्यानंतर निव्वळ खर्चही सुटणार नाही अशा विचाराने त्यांनी  ट्रक्टरच्या सहाय्याने मका नांगरण्यास सुरुवात केली.
मका हे कसमादे परिसरातील पारंपरीक पिक असल्याने संपूर्ण देवळ्या तालुक्यात मक्याचे पिक घेतले जाते.  मका पिकावर सलग दोन ते तीन वर्षापासून लष्करी अळी आढळून येत आहे.पण यावर्षी लष्करी अळीचा काही जास्तस प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने मका पिक येणेच संकटात आले आहे.संदिप भामरे यांनी महागड्या किमतीचे विवध रासायनिक औषधे फवारुन्ही लष्करी अळीवर फारसा परिणाम झाला नाही.
मागील वर्षी दुष्काळाला तोंड द्यावे लागले  पेरणीसाठी व रासायनिक औषधादांसाठी आणलेले उसनवारीचे पैसे उत्पादन खर्चीही निघणार नाही यामुळे संदिप भामरे यांच्यासह अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यावर्षी मका पिक चांगले उत्तपन देईल व दुष्काळाच्या झळांपासून बाजूला सावरू अश्या आशेने शेतकर्यांनी मका पिक पेरलेले आहे.  आता मका नांगरण्याने दुष्क्काळात तेरावा महिना अशी गोष्ट झाली आहे.मक्याचे उत्पन्न धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ लागला आहे. मागील वर्षी दुष्काळी परीस्थितीतून हळूहळू बाजूला सावरू लागलेल्या शेतकऱ्याला आता मका पिकाने संकटात आणले आहे.
विमा भरपाई मिळावी शेतकरऱ्यांची मागणी
मका पिकावर पिक विमा काढलेला आहे. पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून विमा हप्ता भरून घेतला आहे.सततधार पावसामुळे आणि आक्रमक लष्करी अळीमुळे होत असलेले मक्याचे नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांवर मका नांगरण्याची वेळही अळी साधे भांडवलही सुटणार नाही म्हणून प्रशासनाने नुकसानग्रस्त  मका पिकाचे पंचनामे करून पीक विमा मिळवून देण्यास मदत मागणी वासोळ परिसरातील शेतकऱ्यांनी देशदूतशी बोलतांना केली.
मक्यावर लष्करी अळी व पावसाच्या वातावरणामुळे मका पिवळा पडायला लागला असल्याने भांडवल सुद्धा सुटणार नाही म्हणून मका नांगरण्याची वेळ आली याकडे प्रशास्नानाने लक्ष देऊन पिक भरपाई द्यावी.
संदिप भामरे (शेतकरी)
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!