Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘त्या’ प्रकरणात संबंध नाही; बदनामी करणार्‍यांवर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार : आमदार देवयानी फरांदे

Share
‘त्या’ प्रकरणात संबंध नाही; बदनामी करणार्‍यांवर अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार, nashik news defamation suit Opposition mla deoyani pharande breaking news

नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत माझ्या विरोधात उमेदवारी करणार्‍या कॉंग्रेसच्या उमेदवार असलेल्या डॉ. हेमलता पाटील यांचा दारुण पराभव झाला होता. म्हणून ‘त्या’ माझ्यावर खोटे आरोप करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

खोटी माहिती पसरून बदनामी करणार्‍यांविरुध्द लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिली. भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे देखील सोबत उपस्थित होते.

जिल्ह्यातील दरी मातोरी येथील एका फार्महाऊसवर डिजे चालकांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहे. मात्र माझा आरोपींशी काहीच संबध नाही.

अत्याचार घटनेचे राजकारण करुन गंभीरता नष्ट केली जात आहे. मिडियाच्या माध्यमातून संशयितांशी नातेसंबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात त्याला मी ओळखत नाही. गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी देखील आ. फरांदे यांनी यावेळी केली. मला गुंडानी नाही तर शहरातील सुजाण नागरिकांनी निवडून दिलेले आहे. या घटनेशी संबंध जोडून राजकीय आकसापोटी बदनामी केली जात आहे.


पीडितांना न्याय मिळावा

दरी मातोरीत झालेली अमानुष अत्याचाराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. पीडितांना न्याय देण्यासाठी पोलिसांनी तपास करत कारवाई करावी. पीडितांना योग्य तो औषधोपचार करण्यात यावेत, अशी मागणी आ. फरांदे यांनी केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!