नाशिक शहर पोलीस उपआयुक्तांच्या अंतर्गत बदल्या
Share

नाशिक | प्रतिनिधी
शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नुकतेच पोलीस उपआयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांचे अंतर्गत खांदेपालट आज केले. पोलीस उपआयुक्त अमोल तांबे यांच्याकडे परिमंडळ दोनची जबाबदारी होती. नवीन बदलानुसार, ते परिमंडळ एकची जबाबदारी स्वीकारतील.
तर त्यांच्या परिमंडळ दोनची जबाबदारी नवनियुक्त उप आयुक्त विजय खरात हे सांभाळतील. परिमंडळ एकचे उप आयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या जबाबदारीत बदल करण्यात आला असून ते आता शहर गुन्हेशाखा व विशेष शाखेचा भार सांभाळणार आहेत.
तर यापूर्वी पोलीस आयुक्तालयाचे प्रशासन, मुख्यालयाची जबाबदारी पार पाडणार्या माधुरी कांगणे यांची बदली झाल्याने या रिक्त पदावर गुन्हेशाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांची नियुक्ती केली असून मुख्यालय प्रशासनासह त्यांच्याकडे शहर वाहतूक शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याचीही जबाबदारी असणार आहे.
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस उपायुक्तांची खांदेपालट पहिल्यांदाच केली आहे. तसेच, याबाबतची चर्चाही अनेक दिवसांपासून होती.