Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

प्रशासनाकडून कोसळलेल्या टाकीची गंभीर दखल; चौकशी होणार; दोषींवर कारवाईचा बडगा

Share

डांगसौंदाणे | प्रतिनिधी

येथील भारत निर्माण योजनेअंतर्गत  बांधण्यात आलेली 75 हजार लिटर क्षमतेची सुमारे 50 फुट उंच पाण्याची टाकी काल (दि17) रोजी सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान,  घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे पुरुषोत्तम ठाकुर कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) बागलाणचे गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे पाणीपुरवठा चे उपअभियंता बी. टी मोराणकर सहाय्यक गटविकास अधिकारी नितिन देशमुख, यांच्यासह बाग़लाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली.

या घटनेत मोठे आर्थिक नुकसान  झाल्याने याची गुणवत्ता नियंत्रणकडून तपासणी केली जाणार आहे. तसेच या घटनेत दोषींवर कडक कारवाईदेखील करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  त्यामुळे या घटनेतील दोषींवर कारवाईचा बडगा कायम आहे.

आमदार दिपीका चव्हाण या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी विधानसभेत करणार असल्याची माहिती माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली. यावेळी उपसरपंच वैशाली बधाण ग्रामपंचायत सदस्य विजय सोनवणे पंढरीनाथ सोनवणे, ग्रामथ निवृत्ती सोनवणे पंढरीनाथ बोरसे ,मनोज सोनवणे, पंकज भदाणे, धनंजय देशमुख, गोविंद चिंचोरे आदी उपस्थित होते.

यावेळी एकलव्य आदिवासी वस्तीत असलेल्या पाण्याच्या टाकीची ही पाहणी करण्यात आली. तालुक्यातील पूर्ण झालेल्या पाणी योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता मोराणकर यांनी दिली. तर गुणवत्ता नियंत्रण समितीने दिलेला अहवाल आणि अंदाजपत्रका मध्ये तरतूद असलेले साहित्य याचा अहवाल ग्रामस्थांपुढे प्रशासनाने खुला करण्याची मागणी माजी उपसरपंच निवृत्ती सोनवणे यांनी अधिकार्यांकडे केली तर घटना घडून दोन दिवस झाल्यावरही या कामाचा तांत्रिक सल्लागार अजून घटनास्थळी न फिरकल्याने ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केली.

तालुक्यात भारत निर्माण योजनेतून सुमारे 60 ते 70 गावांना पाणी पुरवठा योजना करण्यात आल्या आहेत. अनेक योजना आजही अपूर्ण अवस्थेत पडल्या आहेत. तर अनेक ठिकाणी निकृष्ट दर्ज्याचे कामे करण्यात आले आहेत. यातील बहुतांश योजनांचा तांत्रिक सल्लागार हा एकच आहे. तांत्रिक सल्लागारवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.

माजी आमदार संजय चव्हाण, बागलाण

कोसळलेल्या टाकीची पाहणी गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तांत्रिक बाबींची गांभीर्याने दखल घेतली जाईल.

जितेंद्र देवरे(गट विकास अधिकारी बागलाण)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!