Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

दांडियात रंग भरणाऱ्या ‘टिपऱ्या’ बाजारात खातायेत ‘भाव’

Share

नाशिक | चैत्राली अढांगळे

नवरात्रोत्सवाला सर्वत्र प्रारंभ झाला आहे. दरवर्षी दांडियाचे वेगवेगळे ट्रेंड बघायला मिळतात. यावर्षीही अनेक वेगवेगळ्या टिपऱ्या बाजारात दाखल झाल्या असून तरुणाईचा कल कलरफुल टिपऱ्याकडे अधिक दिसून येत आहे. गरबासोबतच प्रमुख आकर्षण ठरणाऱ्या रास दांडियाचा उत्साह विविध ग्रुप्समध्ये दिसून येत आहे. दांडियासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या टिपऱ्याही बाजारात दाखल झाल्या असून नवरात्रोत्सव सुरु झाल्यानंतरही मागणी वाढल्यामुळे पारंपरिक, तसेच वैविध्यपूर्ण प्रकारांना मागणी आहे.

नवरात्रोत्सवात नाशिक शहरासह जिल्ह्यात दांडियाची मोठ्या प्रमाणात धूम असते. त्यासाठी तरुणाई आधीपासूनच तयारीला लागत असते. गेल्या काही गेल्या काही दिवसांपासून नवरात्रोत्सवाला कशाप्रकारे सामोरे जायचे याविषयी नियोजन सुरु होते.

नवरात्रोत्सवासाठी लागणारे ड्रेस, विविध प्रकारच्या दांडिया दरवर्षी खास खरेदी केल्या जातात. शहरामध्ये आदिवासी भागातून दांडिया विक्रीसाठी अधिक येतात. अदिवासी बांधव बांबू घेऊन शहरातील रामसेतू पुलाजवळ असलेल्या म्हसोबा पटांगणावर ठाण मांडून दांडिया तयार करतात.

साधरणतः पेरूच्या झाडाच्या काठ्या यासाठी वापरल्या जातात असे ते सांगतात. पेरूची काठी टणक असल्यामुळे ती सहसा लवकर तुटत नाही. यासोबतच अन्य झाडांच्या लाकडाचा वापरही यासाठी केला जातो. या टिपऱ्या पॉलिश पेपरने घासून त्यावर रंग चढविला जातो. त्यानंतर टिपऱ्या शहराच्या विविध भागात विक्री करण्यास हे आदिवासी बांधव सुरुवात करतात.

नव्या डिझाईन्सचे आकर्षण

शहरातील बोहरपट्टीतदेखील टिपऱ्यांची विक्री होते. या ठिकाणी नवनवीन डिझाईन्सच्या टिपऱ्या आल्या आहेत. टिपऱ्यांना आकर्षक कापडाचे वेस्टन लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कलाकुसरदेखील करण्यात आली आहे. विविध रंगांनी नक्षी असलेल्या टिपऱ्या विकल्या जात आहेत. यात पारंपरिक टिपऱ्या अर्थात लाकडापासून तयार केल्या जाणाऱ्या 20 रूपये जोडी, विविध रंगांनी नक्षी काढलेल्या फ्रिल बांधलेली टिपरी ही विशेष आकर्षण ठरत आहे .मेटल मध्ये टिपऱ्याना विशेषतः युवक युवती वर्गाला भुरळ पाडत आहे. याची किंमत साधारण 60 ते 70 रुपये आसपास आहे. पूर्वीपासून बेअरिंगच्या टिपऱ्या स्टील मध्ये विकायला असून याची किंमत 70 ते 80 रुपया दरम्यान किंमत आहे.पण, यावर्षी नवरंगी टिपऱ्याना जास्त मागणी आहे, या टिपऱ्या ना विकत घेताना एक वेगळीच मजा अनुभवायला मिळते असे अनेक ग्राहक सांगतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!