Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

कर्जदार शेतकऱ्यांना पीकविमा ऐच्छिक; येत्या खरिपात विमा संरक्षित क्षेत्रात घट होण्याचा अंदाज

Share

नाशिक । प्रतिनिधी 

शेतकऱ्यांसाठी फलदायी असणारी पीक विमा योजना केंद्र सरकारने कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक करण्याचा निर्णय घेतला आहे. पीक विमा उतरवणे ऐच्छिक करण्यात येणार असल्याने २०२०-२१ च्या खरिपात विमा संरक्षित क्षेत्र २० ते ३० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री मंडळाने कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा ऐच्छिक करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना पीककर्ज देताना बँका विम्याच्या हप्त्याची रक्कम मंजूर कर्जातून कापून घेत होत्या.परिणामी कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना बंधंनकारक होती. केंद्राने पीक विमा योजनेत सुधारणा केल्यानंतर अनेक शेतकरी या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

सुधारित पीकविमा योजनेची अंमलबजावणी येत्या खरिपापासून होणार आहे. खरीप हंगामापासून शेतकऱ्यांसाठी पीकविमा योजना ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून  पीकविमा योजनेविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना योजनेचे फायदे समजावून सांगून त्यांनी पीकविमा योजनेत सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न केले जातील. नैसर्गिक संकटांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.


यंदा सहा कोटी शेतकऱ्यांचा सहभाग

पीकविमा योजनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. २०१८-१९ मध्ये एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी केवळ ३० टक्के पिकांना पीकविम्याचे संरक्षण होते. मात्र, यंदा देशातील जवळपास ५ कोटी ९० लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेचा लाभ घेतला असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!