मुलीच्या हातातून बॅग हिसकावून पोबारा

0
नवीन नाशिक | सुमन पेट्रोल पंपावर काम करणारी मुलगी पैशांचा भरणा करण्यासाठी निघाली असता अज्ञात चोरट्यांनी तिच्या हातातील बॅग हिसकावून पोबारा केला. या नेमकी रक्कम किती होती याची माहिती अजून मिळू शकली नसली तरी सततच्या घडत असणाऱ्या घटनांमुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत.

या घटनेत मुलीला दुखापत झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा झालेल्या प्रकाराने खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, सी सी टीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून संशयितांचा शोध   घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

*