Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सातपूरला गुंडावर ‘एमपीडीए’ची कारवाई; मध्यवर्ती गुन्हे शाखा, सातपूर पोलिसांची कामगिरी

Share

नाशिक । प्रतिनिधी

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सातपूर हद्दीतील सराईत गुंडाला सातपूर पोलिसांनी झोपडपट्टी दादागिरी कायद्याअंतर्गत (एमपीडीए) स्थानबद्ध करीत त्याची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात केली.

अक्षय उत्तम भारती (22, रा. संभाजी कॉलनी, विधाते गल्ली, सातपूर गाव) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या सराईत गुंडाचे नाव आहे. अक्षय भारती हा सराईत गुंड असून त्याच्याविरोधात जबरी चोरी, दरोडा टाकणे, घरफोडी, विनापरवाना शस्त्र बाळगणे, जबर दुखापत करणे, धमकी, शिवीगाळ, मारहाण करणे यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येऊन तडीपारही करण्यात आले होते. परंतु तरीही त्याच्यात कोणीतीही सुधारणा झाली नाही. उलट त्याच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होऊन परिसरातील नागरिकांमध्ये तो दहशत पसरवत होता. त्यामुळे सातपूर पोलिसांनी सराईत गुंड अक्षयविरोधात स्थानबद्धतेची नोटीस बजावली होती. त्यामुळे गेल्या आठवडाभरापासून तो पसार झाला होता.
मात्र सातपूर पोलिसांना अक्षय भारती हा पुणे जिल्ह्यातील मंचर येथे लपून बसल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी तत्काळ पोलीस पथक रवाना करीत त्याला बुधवारी अटक केली व नाशिकला आणले. त्यास एमपीडीएअंतर्गत नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, भालचंद्र रसाळ, संतोष घुगे, प्रीती कातकाडे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी सदरची कामगिरी बजावली.

Leave a Comment

error: Content is protected !!