Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

चोरी करायला गेला अन् जीवाला मुकला; पंचवटीतील औरंगाबाद नाका परिसरातील घटना

Share

नाशिक । प्रतिनिधी

विद्यूत वितरणच्या विद्यूत रोहित्र (डीपी) मधील अल्युनियमच्या प्लेट चोरणार्‍या चोरट्याचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.12) रात्री पंचवटी परिसरातील केळकरवाडी भागात घडली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटी परिसरातील नवीन औरंगाबाद नाक्यावरील केळकर वाडी येथे सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास विद्युत डीपीच्या संरक्षक भिंतीच्या आतमध्ये एक युवक पडलेला असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना नागरिकांनी दिली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता अज्ञात 30 ते 40 वर्षाचा युवक मयत अवस्थेत दिसून आला. तसेच त्याच्या बाजूला एक अल्युनियमची प्लेट पडलेली आढळून आली.

आजूबाजूला पाहणी केली असता प्रथमदर्शनी हा युवक गर्दुला वाटत असून त्याने विद्युत डीपीमध्ये असलेली अल्युनियमची प्लेट काढण्याचा प्रयत्न केला असता त्याला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाळासाहेब वाघ करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!