Type to search

गुन्हेगारांनो नाशिक सोडा!; पोलीस आयुक्त नांगरे पाटलांची तंबी

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गुन्हेगारांनो नाशिक सोडा!; पोलीस आयुक्त नांगरे पाटलांची तंबी

Share

नाशिक । प्रतिनिधी

गुन्हेगार मुक्त नाशिकच्या दिशेने पोलिसांनी पाऊल टाकले आहे. नाशिक हे गुन्हेगारांसाठीचे शहरच नाही यामुळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, छोटे – मोठे अथवा राजकीय गुंड आहेत अशांनी आताच नाशिक सोडावे अशी तंबी पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरेपाटील यांनी दिली आहे.

शहर पोलीस आयुक्तालयाची सुत्रे 2 मार्च रोजी डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांच्याकडून नांगरे पाटील यांनी घेतली आहेत. तेव्हापासून आयुक्तालय तसेच शहराच्या गुन्हेगारीचा आढावा त्यांनी घेतला असून शहरातील प्रतिष्ठित तसेच इतर नागरीकांकडून त्यांनी गुन्हेगारी बाबत त्यांची मते जाणुन घेतली आहेत.

तोंडवर लोकसभेच्या निवडणुका असल्याने निवडणुकांबरोबरच शहर गुन्हेगारी मुक्त करण्यासाठीची योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचाच एक भाग म्हणून शहरात रस्त्यांवरील गुन्हेगारांची धरपकड सुरू असून त्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम सुरू आहे.

पोलीस प्रशासनाकडे सराईत तसेच गुंड टोळ्या व राजकीय गुंडांच्या कुंडल्या अगोदरच तयार आहेत. त्यांंच्या मुसक्या कशा अवळायच्या आणि कारवाईचा फास टाकून शहर गुन्हे मुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे नांगरे यांनी स्पष्ट केले.

त्यांना भेटण्यासाठी आलेल्या क्रेडाईच्या पदाधिकार्‍यांना अश्‍वस्त करताना त्यांनी सांगीतले की, बांधकाम व्यावसायिकांना कोणी त्रास देत असेल तर पोलीस त्यांना मदत करतील, परंतु व्यावसायिक जर सामान्य नागरीकांची फसवणुक करत असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल.

सामान्य नागरीकांनी बांधकाम व्यावसायिकांच्या फसवणुकी विरोधात कोठे अर्ज करायचे पुढे तक्रार रेरा तसेच इतर कोठे कोठे नोंदवायची याबाबत क्रेडाईने माहिती द्यावी तसे आदेशपत्र पोलीस आयुक्तालयाकडून जारी करण्यात येईल. शहरात मध्यरात्री कोठेही कोणी महिला घराबाहेर पडली तर तीला सुरक्षीत वाटले पाहिजे इतके नाशिक सुरक्षीत होईल असे अश्‍वासन त्यांनी दिले.

बोगस माहिती अधिकार कार्यकर्ते ठोकणार

माहितीच्या अधिकाराचा वापर करणारांचे स्वागतच आहे. परंतु त्याचा गैरवापर करून ब्लॅकमेलिंग करणारांना आपण सोडणार नाही. अशांच्या मार्फत कोणी गुंड अगर टोळ्या हप्ते वसुली सुरू करण्यापुर्वीच त्यांचे गोठोडे आपण वळणार आहोत. यासाठी सर्व नाशिककरांच्या मदतीची आपेक्षा नांगरे पाटील यांनी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!