Type to search

Breaking News Featured सार्वमत

राष्ट्रवादीचा नगरसेवक समदखान अटकेत; भिंगार पोलिसांची कारवाई

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर बंदीच्या काळात पोलिसांशी झटापट करून पसार झालेला राष्ट्रवादीचा नगरसेवक समदखान याला पोलिसांनी आज गुरूवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. मुकुंदनगरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

मोहरम आणि गणेशोत्सवाच्या काळात शहरातील अनेकांना प्रशासनाने हद्दपार केले होते. हद्दपार केलेले लोक नगरात आहे की बाहेर गेले याची खातरजमा करण्यासाठी भिंगार पोलिसांनी स्पेशल पथक नियुक्त केले होते.

हे पथक समदखानच्या मुकुंदनगरमधील घराची झडती घेत असताना तो रस्त्यावरील कारमध्ये दडून बसला होता. पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांना धक्काबुक्की करत तो पसार झाला होता.

भिंगार पोलिसांत या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार असलेला नगरसेवक समदखान हा मुकुंदनगरमध्ये आल्याची माहिती भिंगारचे एपीआय प्रवीण पाटील यांना मिळाली.

एपीआय पाटील स्वत: एएसआय राजेंद्र गायकवाड, हवालदार वराट आणि राजेंद्र सुद्रीक यांच्या पथकाने पहाटेच्या सुमारास मुकुंदनगरात धाव घेतली. त्यावेळी रस्त्यावरून जाताना तो पोलीस पथकाला दिसला. पोलिसांनी त्याला झडप मारून पकडले. त्याला सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!