नाशिक शहरात बाधीत रुग्णांचा आकडा ९९ वर; अशी आहे नव्याने आढळून आलेल्या रुग्णांची हिस्ट्री

jalgaon-digital
3 Min Read

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात दि.20 ते 25 मे या सहा दिवसात नाशिक शहरात पुर्वीच्या करोना बाधीतांच्या संपर्कात आलेल्या 53 जणांना करोनाची लागण झाली असुन महापालिका व आरोग्य यंत्रणा खडबडुन जागी झाली असुन वाढलेला आकडा पाहता तातडीच्या उपाय योजना करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. यामुळे शहरातील बाधीताचा आकडा शतका नजीक म्हणजे 99 पर्यत येऊन पोहचला असुन मृताची संख्या 5 झाली असुन यात 1 जण बाहेरील व्यक्ती आहे.

शुक्रवारी (दि.22) रात्री शहरात संजीवनगर शिवार (सातपूर अबंड लिंकरोड) येथील मृताच्या संपर्कातील 11 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी (दि.23) रोजी दुपारी 2 व सायंकाळी 6 असे एकुण आठ करोना बाधीत समोर आले होते. त्यानंतर रविवारी (दि.24) रोजी 15 बाधीत आढळून आले होते. यात पंचवटीतील मार्केट यार्डालगत असलेल्या हॉटेल संंचालक याचे नाशिक मार्केट कमेटीत ये जात असल्याने त्याचा नमुना पॉझिटीव्ह आला आहे.

मुमताझनगर वडाळा येथील बाधीत रुग्णांच्या संपर्कातील 16, 67 व 22 वर्षीय पुरुष व 15 व 18 वर्षीय युवती अशा 5 जणांना बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.. संजीवनगर (सातपूर अंबड लिंकरोड) येथील मृताच्या संपर्कातील 8 व 2 वर्षीय बालक व 10 वर्षीय बालिका यांना करोना झाला आहे. तसेच विसे मळा कॉलेजरोड येथे राहणारे मालेगांव येथील पोलीस सेवक यांच्या कुटुंबातील 17 व 23 वर्षीय युवती करोना बाधा झाल्या आहेत.

तसेच महाराणा प्रताप चौक नवीन नाशिक येथील बाधीत रुग्णांच्या कुटुंबातील 33 महिला व 1 वृद्द व्यक्ती अशा 4 जणांना करोना झाला आहे. तसेच सात दिवस मालेगांव येथे काम करुन आलेले व गोेंविदनगर येथील रहिवाशी डॉक्टर यांना करोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी आयुक्तांनी विसे मळा येथील पोलीसांचे घर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे.

आज (दि.25) रोजी शहरात दुपारी 2 वाजता 15 संशयितांना करोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले असल्याने आता शहरातील करोना रुग्णांचा आकडा 99 झाला आहे. यात नाशिकरोड येथील आशिर्वाद बस स्टॉप जवळ राहणार्‍या 67 वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. जेलरोड येथील 45 वर्षीय महिला उल्हासनगर येथे वडीलांच्या अंत्यविधीसाठी गेली होती, तीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

क्रांतीनगर पंचवटी ये्थील 23 वर्षीय युवकास करोना झाला असुन तो नाशिक मार्केट यार्डात कामाला आहे. तसेच विसेमळा कॉलेजरोड भागातील बाधीत पोलीस सेवकांच्या कुटुंंबातील 39 वर्षाय महिला,23 व 17वर्षीय युवती व 15 वर्षीय मुलगा यांना करोना झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला असुन या पोलीसांच्या घरातील 4 जणांना करोना झाला आहे.

तसेच संजीवनगर येथील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या रामनगर पेठरोड येथील महिलेला करोना झाल्यानंतर तिचा रविवारी (दि.24) मृत्यु झाला आहे.तसेच पंडीतनगर येथील बाधीत रुग्णांच्या 26 वर्षीय पत्नीस बाधा झाली आहे. त्याचबरोबर मुमताझनगर वडाळा येथील बाधीत रुग्णांच्या संपर्कातील 15 वर्षीय मुलास करोना झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. अशाप्रकारे शहरातील बाधीतांचा आकडा 99 पर्यत गेला आहे. यामुळे आता प्रतिबंधीत क्षेत्राचा

आकडा 20 झाला आहे.

दरम्यान शहरात आजपर्यत करोना बाधीत भागातून आलेल्याची संख्या 2031 झाली असुन यातील 815 जणांचा देखरेखीखालील 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाला आहे. आत्तापर्यत शहरातील रुग्णालयात 1920 संशयितांना दाखल करण्यात आल्यानंतर उपचार झाल्यानंतर 1748 जणांना घरी सोडण्यात आले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *