Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकमालेगावी आज पुन्हा ५ कोरोना पाॅझिटिव्ह; दोन संशयितांचा मृत्यू, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा...

मालेगावी आज पुन्हा ५ कोरोना पाॅझिटिव्ह; दोन संशयितांचा मृत्यू, जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७९ वर

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगावमध्ये पुन्हा आज सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार नवे पाच रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.  शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६७ वर पोहोचली आहे. नाशिक शहरात आज चार रुग्ण कोरोनाबाधीत आढळून आले आहेत. तर आज मालेगाव शहरात दोन संशयितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दोन्हीही संशयितांचे घशातील स्राव पुणे येथे  तपासणीला पाठवले आहेत. त्यांच्या अहवालाकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील मधील आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७९ वर पोहोचली आहे. यामध्ये नाशिक शहरात ९  जिह्यातील चार तालुक्यांत तीन आणि मालेगावमध्ये एकूण ६७ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. यात  मालेगावातील तरुणीचा मृत्यू धुळे येथे झाला आहे. तर आज दोन संशयितांचा मालेगावी मृत्यू झाला आहे.

आज कमालपुरा परिसरातील ३३ वर्षीय तरुणाचा जीवन हॉस्पिटलमध्ये तर ६५ वर्षीय वृद्धाचा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांचे स्राव पुणे येथे तपासणीला पाठवले आहेत. अद्याप दोन्हीही संशयितांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत.

दरम्यान, मालेगावमधील आठ प्रतिबंधित भागासह इतर भागातून रुग्ण आढळून आल्यामुळे मालेगावची चिंता अधिक वाढली आहे. कालपर्यंत जिल्ह्यात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात काल एक वयोवृद्ध महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला होता. तर एका व्यक्तीचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीचा मृत्यू धुळे येथील रुग्णालयात झाला आहे.

आज आढळून आलेले ५  रुग्ण हे मालेगाव शहरातीलच आहेत. यामध्ये ५४ वर्षीय प्रौढ इस्लामाबाद परिसर, ५४ वर्षीय प्रौढ संगमेश्वर परिसर, ३२ वर्षीय तरुण मोतीपुरा परिसर, ५९ वर्षीय प्रौढ कुसुंबा रोड आणि १८ वर्षीय तरुण न्यू वार्ड परिसरातील असल्याचे समजते.

दुसरीकडे आज नाशिक शहरात आणखी चार रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. हे रुग्ण अंबड लिंक रोडवरील संजीवनगरमधील दोन दिवसांपूर्वी बाधित आढळून आलेल्या महिलेचे निकटवर्तीय असल्याची माहिती  आहे. यामुळे नाशिक शहरात ९ तर  जिह्यातील चार तालुक्यांत तीन आणि एकट्या मालेगावात ६७ रुग्ण वाढल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ७९ वर पोहोचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या