Type to search

नाशिक : पत्नीला कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकास रंगेहाथ पकडले; शिक्षक फरार

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : पत्नीला कॉपी पुरवणाऱ्या शिक्षकास रंगेहाथ पकडले; शिक्षक फरार

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील गंगापूर रोड भागातील महर्षी शिंदे अध्यापक महाविद्यालयात सुरू असलेल्या डी. एड. परिक्षेत पत्नीला कॉपी पुरविणार्‍या शिक्षक पतीला रंगेहाथ पकडण्यात आल्याची घटना घडली. बिल्डींग परीक्षा कंडक्टर यांनी ही कारवाई केली.

परिक्षार्थी महिलेचा पेपर जप्त करण्यात आल्यानंतर बसवून ठेवण्यात आलेला संबंधीत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पती येथून फरार झाला. या प्रकारानंतर त्या शिक्षकावर कारवाई करण्यासंदर्भात शिक्षण विभागाकडुन निर्णय घेतला जात आहे.

शहरातील मविप्र संस्थेच्या महर्षी शिंदे अध्यापक महाविद्यालयात आज (दि.7) सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

या खळबळजनक घटनेत पकडण्यात आलेला बडगुजर नामक शिक्षक नंतर पळून गेला असुन त्यांच्या पत्नीचा पेपर जप्त करण्यात आला आहे.

शिंदे जिल्हा शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेमार्फत घेतल्या जाणार्‍या डि. एड. परिक्षांचे केंद्र अध्यापक महाविद्यालयात आहे. या केंद्रात परिक्षा सुरू आहेत.

याठिकाणी सकाळी पेपर सुरू असतांना एका ब्लॉकवर एक व्यक्ती एका परिक्षार्थीला कॉपी पुरवित असल्याचे बिल्डींग कडक्टर तथा प्राचार्य संजय काळोगे यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ संबंधीत व्यक्तीला ताब्यात घेत आणि परिक्षार्थीचा पेपर जप्त करीत पुढील कारवाईसाठी केंद्र प्रमुख बच्छाव यांच्या कक्षाकडे नेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र काही वेळेनंतर संबंधीत कॉपी पुरविणारी व्यक्ती या कक्षाजवळून पळून गेली. हा सर्व प्रकार काही सुपरवायझर यांच्यासमक्ष घडला.

महर्षी शिंदे अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा बिल्डींग कंडक्टर काळोगे यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. कॉपी पुरविणारा संबंधीत व्यक्ती ही जिल्हा परिषद शाळा कोटंबी (ता. पेठ ) या शाळेतील शिक्षक असुन त्यांचे नाव किरण बडगुजर असल्याची माहिती समोर आली आहे.

तर परिक्षार्थी बडगुजर यांची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. येथील केंद्र प्रमुख बच्छाव यांनी संबंधीत व्यक्तीला बसवून ठेवल्यानंतर पोलीसांत तक्रार न करता वेळ घालविल्यामुळेच बडगुजर हे येथून पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!