Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : ही वर्दी खूप कष्टाने कमावली आहे; तिला कुठेही कलंक लागू देऊ नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Share

नाशिक | प्रतिनिधी 

आपल्याला मिळालेली वर्दी आपल्या आई वडिलांच्या मेहनतीनंतर आणि आपल्या खडतर प्रशिक्षणानंतर मिळाली आहे. त्या वर्दीवर कोणताही डाग, कलंक लागू देवू नका असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या सत्र क्र. ११७ व्या तुकडीचे दीक्षांत संचलन सोहळ्यात बोलत होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या नातलगांची उपस्थिती होती.

ठाकरे म्हणाले, काळानुसार बदलले पाहिजे. तलवार मानाची आहेच. पण पुढल्या वेळेपासून  भविष्यातील आव्हान पेलण्यासाठी मानाची तलवारबरोबरच मानाची रिव्हालवर पुरस्कार देखील दिला जायला हवा. 
ते म्हणाले, पहिल्यांदाच मी इथे आलो. सुरुवातीला अकादमीची एकूण माहिती जाणून घेतली. त्यानंतर अनेक कामे युद्धपातळीवर करावयाची आहेत त्यासाठी महाराष्ट्र सरकार सर्वोतपरी मदत करेल. येथील प्रशिक्षण अभ्यासण्यासाठी विदेशातील पोलीस दल येईल यासाठी प्रयत्न करणार केले जातील.
प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आव्हान स्वीकारण्याबरोबरच त्याचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाला आहे, याचा मला अभिमान वाटत असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर उत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी पुरस्कार विजया पवार यांना तर मानाची तलवार संतोष कामटे यांना प्रदान करण्यात आली. आजच्या सोहळ्यात ‘बेस्ट ऑफ आऊटडोअर स्टडी साठी सागर साबळे, बेस्ट ऑफ इनडोअर स्टडी- संतोष कामटे, सेकंड बेस्ट ट्रेनीसाठी विजया पवार यांचा गौरव करण्यात आला.
परंभी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परेडचे निरीक्षण तर प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षकांनी संचालनाद्वारे मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी आलेल्या नातलगांनी टाळ्यांच्या गजरात प्रशिक्षानार्थ्यांचे स्वागत केले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!