Friday, April 26, 2024
Homeनाशिककोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही परिसर 28 दिवस प्रतिबंधित राहणार; काय आहे नियम?

कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही परिसर 28 दिवस प्रतिबंधित राहणार; काय आहे नियम?

नाशिक । प्रतिनिधी

राज्यासह जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत चालेले आहेत. ज्या-ज्या भागात करोनाचा रूग्ण आढळला आहे. ते ते भाग पोलीसांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत केले आहेत. यासाठी शासनाच्या नव्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून त्यानुसार आता करोना बाधीत क्षेत्रातील शेवटचा रूग्ण पुर्ण बरा होऊन रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्या पुढे 28 दिवसांपर्यंत हे प्रतिबंधीत क्षेत्र राहणार आहे.

- Advertisement -

याबाबत शासनाने आपत्ती व्यावस्थापन कायदा व साथ रोग प्रतिबंधक अधिनियम 1817 नुसार प्रतिबंधीत क्षेत्रासाठी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधीत क्षेत्राची अंमलबजावणी करण्याच्या सुचना केल्या आहेत.

नाशिक शहरात विविध भागात पाच करोनाचे रूग्ण आढळले आहेत. शहरातील पहिला रूग्ण गोदिवंदनगरच्या मनोहरनगर येथे आढळला होता. यानंतर नाशिकरोड, धोंगडेमळा, नवश्या गणपती परिसर, आनंदवली, गंगापूररोड, सातपूर – अंबड लिंकरोड अशे पाच भाग प्रतिबंधात्मक क्षेत्रे म्हणुन घोषीत करण्यात आली आहेत.

रूग्णाच्या घरापासून सर्व बाजुंनी तीन किलोमीटर प्रतिबंधीत क्षेत्र तर पाच किलोमीटर क्षेत्र हे बफर क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले आहेत. या भागात पोलीसांनी पुर्ण बॅरेकेटींग करून अंतर्गत वाहतुक बंद केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी पुर्ण खबरदारी घेऊन ठरावीक नागरीकांनाच बाहेर पडण्याची परवानगी दिली जात आहे.

यापुर्वी हे प्रतिबंधीत क्षेत्र हे रूग्ण सापडल्यानंतर त्यास 14 दिवस कोरोंटाईन केल्याचा कालावधीपुरते मर्यादीत ठेवले होते. 14 दिवसांनतर हे क्षेत्र खुले करण्यात येणार होते.

मात्र, करोना एक रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या सानिध्यातील अनेकजण करोना बाधीत झाल्याचे समोर आले आहे. शासनाच्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधात क्षेत्रात असलेल्या एकुण करोना रूग्णांपैकी शेवटचा रूग्ण पुर्ण बरा होऊन रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यापुढे 28 दिवस प्रतिबंधीत क्षेत्र कायम राहणार असून नंतर ते खुले करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या