Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक शहरात आणखी चार प्रतिबंधीत क्षेत्रातील निर्बंध हटवले; वडाळागांव नवे प्रतिबंधीत क्षेत्र...

नाशिक शहरात आणखी चार प्रतिबंधीत क्षेत्रातील निर्बंध हटवले; वडाळागांव नवे प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर

शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २२ वर

नाशिक । प्रतिनिधी

शहरात गेल्या 42 दिवसात करोना बाधीत रुग्णांची संख्या 48 झाली असुन बाधीत रुग्णामुळे आयुक्तांनी 34 भागात प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले होते. मात्र प्रतिबंधीत काळात नवीन रुग्ण आढळुन न आल्याने आता आयुक्तांनी आजपर्यत 13 प्रतिबंधीत क्षेत्र व दोन हॉस्पिटल यावरुन निर्बंध हटविले आहे. निर्बंध हटविण्यात आल्याने आत्तापर्यत यामुळे प्रतिबंधीत क्षेत्रात अडकलेल्या सुमारे 20 हजार नागरिकांंना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज शहरात वडाळागांव भागात नवीन रुग्ण आढळुन आल्याने याभागाला आयुक्तांनी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन जाहीर केले आहे.

- Advertisement -

आज नाशिक शहरात वडाळागांव भागात आज 1 करोना बाधीत रुग्ण आढळुन आला असुन ही व्याक्ती चालक असुन नाशिक – मुंबई असा प्रवास ते करीत होते. त्यांच्यासह कुटुंबियांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडाळागावात हा रुग्ण राहत असलेला भागाला प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. यामुळे शहरातील रुग्णांची संख्ंया 48 झाली असुन यापैकी 32 जण बरे होऊन घरी गेले आहे.

ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले, त्या भागात संसर्ग झालेला नसुन नंतरच्या काळात नवीन रुग्ण देखील आढळून आलेला नाही. याच कारणास्तव महापालिका क्षेत्रातील 13 प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्वच निर्बंध मागे घेण्यात आले असुन या भागातील जनजीवन इतर भागाप्रमाणे सुरु झाल्याने याभागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शहरात 6 एप्रिल 2020 रोजी पहिला करोना रुग्ण आढळून आला होता. नंतर दि.19 मेपर्यत शहरात एकुण 35 प्रतिबंधीत क्षेत्र झाली होती. याच दरम्यान मागील आठवड्यात आयुक्तांनी तीन क्षेत्रातील निर्बंध हटविल्यानंतर रविवारी (दि.17) रोजी चार प्रतिबंधीत क्षेत्रातील निर्बंध मागे घेतले होते.

यानंतर मंगळवारी (दि.19) रोजी आयुक्तांनी माणेक्षानगर (द्वारका परिसर), रुषीराज प्राईड शांतीनिकेतन चौक गंगापूररोड, हनुमान चौक (नवीन नाशिक) येथील प्रथम हॉस्पिटलचे संस्थात्मक अलगीकरण व नवश्या गणपती भागातील बाधीत महिलेला घरी सोडण्यात आल्याने देसले हॉस्पिटलचे संस्थात्मक अलगीकरण अशाप्रकारे चार ठिकाणचे प्रतिबंधीत क्षेत्राचे निर्बंध मागे घेतले. यामुळे आता शहरात 22 प्रतिबंधीत क्षेत्र शिल्लक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या