Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आचारसंहितेमध्ये अनेक कायद्याचे एकत्रीकरण : मांढरे  

Share
नाशिक  | प्रतिनिधी 
आचारसंहिता म्हणजे कायदा नाही तर अनेक कायद्यातील कलमांचे एकत्रीकरण आचारसंहितेत करण्यात आले आहे. आचारसंहिता समजावून घेऊन त्या मार्गाने आपण जात आहोत की नाही, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी माध्यमे आणि पत्रकारांची असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शुक्रवारी सांगितले.
एचपीटी आर्टस् अँड आरवायके सायन्स महाविद्यालयातील जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या वतीने विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित राजकीय जनजागृती कार्यक्रमात ‘आचारसंहिता आणि निवडणूक कामकाज’ या विषयावर संवाद साधताना त्यांनी आचारसंहिता समजावून सांगितली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्या आणि पत्रकारिता विभाग प्रमुख डॉ वृंदा भार्गवे,उपप्राचार्या मृणाल देशपांडे, प्रणव रत्नपारखी, प्राध्यापक दिवटे, प्रशांत देशपांडे, विजय प्रसाद अवस्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक रमेश शेजवळ यांनी आभार मानले.निवडणूक आचारसंहिता आधीपासूनच अस्तित्वात होती, या आचारसंहितेचा प्रभावी वापर लोकशाही बळकट करण्यासाठीच आहे. आचारसंहिता हा स्वतंत्र कायदा नाही तर अनेक कायद्यातील कलमांचे एकत्रीकरण आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ पार पाडण्यासाठी आचारसंहिता आहे.

मतदान यंत्रे सुरक्षित असतात, त्यात कोणताही फेरफार करता येत नाही. मतदान यंत्रात बदल केले जातात, ही केवळ मानसिकता आहे. मतपेट्या होत्या तेव्हा त्या बदलल्या जातात, ही पूर्वीची मानसिकता होती, तीच मानसिकता मतदान यंत्रांविषयी असल्याचे त्यांनी सांगितले. आपली लोकशाही सुदृढ होण्यासाठी माध्यमे, पत्रकार, समाजमाध्यमांवरील वापरकर्ते यांनी जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आचारसंहितेतील निवडणुकीची अंमलबजावणी, पक्षांच्या बैठका, जाहीरनामे, मतदानाचा दिवस, मतदान केंद्रे, निवडणूक निरीक्षक, अधिकारी  आणि मतदारांमध्ये निर्माण केली जाणारी दहशत अशा आठ महत्त्वाच्या मुद्द्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश टाकला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!