Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या राजकीय

‘महाजनादेश’चा तिसरा टप्पा; १९ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी समारोपासाठी नाशिकमध्ये येणार

Share

नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपची महाजनादेश यात्रा सुरू आहे. यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा समारोप नुकताच गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झाला. तर येत्या १३ सप्टेंबरपासून तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यास सुरुवात होणार आहे. नाशिकमधून या यात्रेचा समारोप १९ सप्टेंबरला होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यात्रेचा समारोप होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिकमधील भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांनी देशदूतशी बोलताना माहिती दिली. महाजनादेश यात्रेच्या तिसरा टप्प्याच्या समारोपाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. तिसरा टप्प्याची सुरूवात १३ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान होणार असून  ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि नाशिक असा महाजनादेश यात्रेचा प्रवास आहे.

१९ सप्टेंबर रोजी महाजनादेश यात्रेचा समारोप कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींचा हा दौरा महत्त्वाचा आहे.

महाजानादेश यात्रेचे एकूण टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांमधून ही यात्रा जाणार आहे. यादरम्यान ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा होणार आहेत. याशिवाय एकूण २३८ पेक्षा अधिक गावांमध्ये स्वागत स्वीकारून यात्रा नाशिक येथे पोहोचणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!