Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

नाशिक : दंड करा…जनजागृती करा…आम्ही सुधारणार नाही; हेल्मेटसक्तीला वाटाण्याच्या अक्षता

Share

नाशिक | नंदिनी खंडारे, अश्विनी राठोड 

हेल्मेट घालायला मला आवडत नाही ते अस्वस्थ आणि गरम आहे. छे हेल्मेट घातल्याने माझे केस विसकटतात. मला थोड्याच अंतरावर जायचे आहे…म्हणून हेल्मेट घालत नाही. हेल्मेटने मला आजूबाजूचे दिसत नाही…सतत समोर बघावे लागते. अशा नानाविध कारणांनी नाशिकच्या हेल्मेट सक्तीला वाटण्याच्या अक्षता दिल्या असल्याचे शहरात चक्कर टाकल्यावर लक्षात अल्याबिगर राहत नाही.

शहर परिसरात वाहतूक नियमांचे पालन न केल्यामुळे होणारे अपघात लक्षात घेऊन शहर पोलिसांकडून पुन्हा एकदा हेल्मेट सक्ती सह बेशिस्त दुचाकी आणि चार चाकी वाहनचालकांसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

तरीदेखील शहरात वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे आणि वाहतूक सुरक्षेने नियम धाब्यावर ठेवत सैरावैरा वाहने दामटल्याच्या घटनांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

अपघाताच्या कारणांचा विचार केला तर विना हेल्मेट दुचाकी चालविणे, विना सीटबेल्ट चार चाकी चालविणे वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी कारणे येत आहेत.

अपघातांची वाढती संख्या व त्यात बळी जाणारे जीव दुर्दैवाचा फेरा चुकवायचा असेल तर हेल्मेट परिधान करणे व प्रत्येकाने जीवाची काळजी घेतल्याशिवाय पर्याय नाही.

शहरात कानाकोपऱ्यात पोलिसांनी हेल्मेट परिधान न करणाऱ्यांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करतात. ठिकठिकाणी सामाजिक संस्था वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती केली जाते. मात्र, नागरीकांना कुठलाही परिणाम झालेला दिसून येत नाही.

हेल्मेट वापरण्यात सातत्य राहावे याकरिता पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी मोहिमा सुरु केल्या आहेत. यावेळी वेगवेगळी करणे तरुणाईसह सर्वच सांगतात.

काही कारणे ऐकून तर पोलीसही अवाक होतात. आजही प्रत्येक सिग्नलवर, वर्दळीच्या रस्त्यांवर अनेक दुचाकीस्वरांचे हेल्मेट हेंडलला, कुणाचे कॅरीयारला लॉक केलेल्या स्वरुपात, मागील दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीच्या हातात हेल्मेट दिसून येते.

मोपेड वाहनांना तर कॅरियर मोठी असल्याने त्यांच्या डिकीमध्येच हेल्मेट आढळून येतात. अशा वेळी नागरिक पोलिसांची हेल्मेट सक्ती मोहीम सुरु असताना दुचाकी थांबवून तात्पुरत्या स्वरुपात नियम पाळत असलायचे सोंग घेतात असेही एका पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.

आपली घरी कुणीतरी वाट पाहत आहे. निदान त्यांच्यासाठी तरी हेल्मेट परिधान करावे असे आवाहन नाशिकमधून पोलिसांसह सामाजिक संस्था करत असतात मात्र, या आवाहनास वाटण्याच्या अक्षतांशिवाय काहीही मिळालेले दिसून येत नाही.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!