गणेशोत्सवात जुगार खेळणाऱ्या १५ जणांवर गुन्हा

0

नाशिक | गणेशोत्सव काळात रात्री जुगार खेळणाऱ्या दोन घटनांत १५ जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. पहिली घटना विठ्ठल मंदिराच्या मागे काजीपुरा शिवक्रांती सांस्कृतिक गणेश मंडळाच्या मागे असलेल्या गणपतीच्या लाईट खाली आणि गोविंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत हिरामण फकिरराव काशमीरे, (वय 58, रा. विष्णु सागर सोसा. रूम नं. 5 मानकशा नगर, द्वारका नाशिक) कांतीलाल मुरलीधर बिरार , (वय 52, रा. साक्षी सोंसा. रूम नं. 2 सुरभी हॉटेलमागे गडकरी चौक नाशिक), पंकज प्रमोद काळे, (वय 42, रा. हरीहर कॉलणी नासर्डी पुलाजवळ बनकरमळा नाशिक) संजय  मुरलीधर अवरसकर, (वय 48, रा. घर न. 2698 संत नामदेव पथ जुने नाशिक) जहिर जराक शेख (वय 39, रा. चौकमंडई जुने नाशिक), विनायक अजु नर् करंजकर, (वय 34, रा. घर नं. 1977 मधली होळी जुने नाशिक), गणेश हिरामण तोरे (वय 31, रा. विष्णु कन्हैया सा ेसा. जनरल वैदय नगर भाभानगर नाशिक), रूषीकेश वासुदेव काळे, (वय 21, रा. घर न. 2697 काजीपुरा जुने नाशिक) वरील सर्वजण जुगार खेळत होते.  यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात  0493/2018, मुंबई पोलीस अधिनियम, 1951 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच दुसऱ्या घटनेत रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भावसागर भवनच्या पाठीमागे, नासर्डी नदीजवळ, चौक नं. 4, गोविंदनगर परिसरातील मोकळ्या जागेत  लक्ष्मण गोटीराम दावाड, (वय 36), शरद सोमनाथ पागे (वय 23), उमेश किशोर गायकवाड, (वय 19), सागर हरी भांगरे , (वय 20) योगेश दामू कडाळे , (वय 22) दिलीप नामदेव भांगरे, (वय 22),  सिध्दार्थ माणिक मोरे (वय 22, रा. भावसागर भवनच्या पाठीमागे, नासर्डी नदीजवळ, चौक नं. 4,
गोविंदनगर, नाशिक) यांच्याविरोधात 272/2018, जुगार अधिनियम, 1867 कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि भद्रकाली पोलीस ठाण्याकडून सुरु आहे.

LEAVE A REPLY

*