डोक्याला रिव्हॉल्वर लावून गाळा बळकवला; सुहास कांदेंवर गुन्हा दाखल

0
नाशिक | डोक्याला  रिव्हॉल्वर लावून गाळा बळकवल्याप्रकरणी शिवसेना ग्रामीण जिल्हाध्याक्षावर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, २१ जुलै २००७ रोजी साडेआठ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर येथील सिल्व्हर प्लाझा बिल्डींगजवळ सुहास द्वारकानाथ कांदे (रा. काळेनगर, पाईपलाईनरोड आनंदवल्ली नाशिक) याने फिर्यादी पवन बाळकृष्ण क्षीरसागर यांच्या डोक्यावर बंदूक ठेवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तसेच कोऱ्या कागदावर तसेच हिरव्या लेझर पेपरवर सह्या करून घेतल्या. तसेच क्षीरसागर यांना गाळ्याबाहेर काढत गाळयाला स्वतःचे कुलूप लावले. तेव्हापासून आजपर्यंत या गाळ्यात कांदे यांचे संपर्क कार्यालय आहे. पोलीस तपास सुरु असून अद्याप कांदे यांना अटक झालेली नाही.

LEAVE A REPLY

*