Friday, April 26, 2024
Homeनाशिकलॉकडाऊन शिथील करताच शहरात गर्दी वाढली; अत्यावश्यक सेवांवर पुन्हा निर्बंध – जिल्हाधिकाऱ्यांचे...

लॉकडाऊन शिथील करताच शहरात गर्दी वाढली; अत्यावश्यक सेवांवर पुन्हा निर्बंध – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक |  प्रतिनिधी

राज्य शासनाने सोमवारी (दि.२०) काढलेल्या आदेशानुसार, लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर यात महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतीतील अत्यावश्यक वस्तु विक्री आस्थापना व सेवा यांना वेळेला कोणतेही वेळेचे बंधन न घालण्याचे आदेश दिले होते. मात्र आजच्या पहिल्याच दिवशी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यासंदर्भातील प्राप्त अहवाल लक्षात घेत, अत्यावश्यक विक्री – सेवा आस्थापनांना पुर्वी प्रमाणेच सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यत सुरू ठेवण्यात परवानगी राहील असा आदेश आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काढला आहे.

- Advertisement -

शहर व जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक वस्तु सेवा दुकाने – आस्थापनांना सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यत अशी वेळ देण्यात आली होती. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त यांनी एकत्र बैठक घेत हा निर्णय घेतला होता.

त्यामुळे किराणा दुकान, भाजीपाला व दूध विक्री आणी इतर अत्यावश्यक सेवेची दुकाने दिवसातून फक्त सहा तास खुली होती. मेडिकल, क्लिनीक, रुग्णालय यांना सवलत देण्यात आली होती. रस्त्यावरील बाजारातील गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येऊन तो लागु झाला होता.

मात्र राज्य शासनाने लॉकडाऊनमधून सोमवारी काही बाबी शिथील करीत अर्थिक चक्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यात अत्यावश्यक वस्तु विक्री व सेवा यासाठी वेळेचे कोणतेही बंधन घालु नये असे निर्देश दिले होते. याच शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सोमवारीच महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तु विक्री व सेवा देणारे, किराणा दुकाने, भाजीबाजार यांच्यावरील वेळेच बंधन मागे घेतले होते.

परंतु मंगळवारी (दि.२१) या पहिल्याच दिवशी शहरी व ग्रामीण भागात नागरिक भाजीपाला व इतर वस्तु खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचे दिसुन आले आहे. तसेच सकाळी फिरण्यासाठी नागरिक बाहेर पडत आहे. हा प्रकार म्हणजे करोना प्रादुर्भाव रोकण्याच्या उद्देशात बाधा आणली जात आहे.

यासंदर्भातील अहवालाची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी आज (दि.२१) नवीन आदेश काढला आहे. यात जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत कार्यक्षेत्रात भाजीपाला , फळे , किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तुची दुकाने उघडणे आणि विक्री करणे यासाठी सकाळी १०.०० ते दुपारी ०४.०० पर्यत या वेळेचे बंधन राहील. तसेच किरकोळ दुध विक्री करता सकाळी ०६.०० ते ०७.३० आणि सायंकाळी ०४.०० ते ०५.३० या वेळेचे बंधन राहील.

इतर वेळेत या आथापना बंद राहतील . तथापि वैद्यकीय सेवा, वैद्यकीय आस्थापना आणि मेडिकल दुकाने या करिता हे प्रतिबंध लागु राहणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या