Type to search

नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांनी केली अंबड येथील मतमोजणी केंद्राची पाहणी

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

नाशिक : जिल्हाधिकाऱ्यांनी केली अंबड येथील मतमोजणी केंद्राची पाहणी

Share

नाशिक | प्रतिनिधी 

अंबड वेअर हाऊस येथे ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिनची सर्व कडेकोट सुरक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची मतदान प्रक्रिया 29 एपिल 2019 रोजी पूर्ण झाली आहे. 20 दिंडोरी व 21 नाशिक या मतदारसंघाची मतमोजणी 23 मे 2019 रोजी होणार असल्याने अंबड वेअर हाऊस येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा दिंडोरी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर, अरविंद अंतुर्लीकर, कुंदन सोनवणे, प्रकाश थाविल, पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कंट्रोलरुममध्ये ठेवण्यात आलेल्या सिसिटीव्हीची पाहणी करून नाशिक व दिंडोरी मतमोजणीच्या केंद्रात हवा, प्रकाश व वीज व्यवस्था त्याचप्रमाणे सुरक्षेच्याबाबत आवश्यकती काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या.

तसेच मतमोजणीच्या दिवशी मिडिया कक्षासाठी निश्चित केलेल्या जागेची देखिल जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. सुरक्षेच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी अंबड येथील सुरक्षा अधिकाऱ्यांना दिले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!