Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रवादीनंतर दिंडोरीत कॉंग्रेसलाही धक्का; माजी आमदार रामदास चारोस्कर यांचा शिवसेनेत प्रवेश

Share

नाशिक | प्रतिनिधी 

माजी आमदार धनराज महाले यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज दिंडोरी-पेठ तालुक्याचे माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठा कार्यकर्त्यांचा ताफा चारोस्कर यांच्यासोबत मुंबईत गेला होता. उद्धव ठाकरे यांनी गॅलरीत येऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले.

चारोस्कर यांच्या प्रवेशशासोबातच दिंडोरीचे नगरअध्यक्ष,  उपनगराध्यक्ष   यांच्यासोबत पाच नगरसेवक, तीन पंचायत समिती सदस्य,
दोन जिल्हा परिषद सदस्य यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघ राखीव असून या मतदारसंघात सध्या आ. नरहरी झिरवाळ यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तथापि राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेने मोट बांधली असून याअगोदर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीत गेलेले धनराज महाले यांचा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख सतीश देशमुख यांच्या पुढाकाराने शिवसेनेत प्रवेश झाला.

आता रामदास चारोस्कर यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चारोस्कर यांच्याबरोबर दिंडोरी नगरपंचायतीचे समर्थक नगरसेवक, पं. स. सदस्य, दिंडोरी-पेठ तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच, अनेक काँग्रेसचे लोकप्रतिनिधी शिवबंधन बांधत चारोस्कर यांची ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेची ताकद अधिक वाढली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!